लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : क्रीडा क्षेत्रात राज्य प्रगतीपथवर जावे यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. फार मोठी रक्कम खर्च करुन क्रीडा संकूल व बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. क्रीडा संकुल परिसरात जाण्यासाठी असलेले गेट व प्राणायामासाठी सकाळीच घराबाहेर पडणाºया महिलांना क्रीडा संकुलात प्रवेश मिळत नसल्याने कुलूपबंद गेटसमोर प्राणायमासाठी बसावे लागत आहे.शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाने निधी उपलब्ध करुन दिल्याने खापरी रोडवरील प्रशस्त जागेवर क्रीडा संकूल उभारण्यात आलेले आहे. संकुलाचे बाजूला घणकचरा व्यवस्थापन केंद्र व डंपींग ग्राऊंड आहे. क्रीडा संकुलाची गेट ये-जा करण्यासाठी वापरली जाते. क्रीडा संकूल अद्यापतरी पालीका प्रशासनाला हस्तांतरित झालेले नाही व होण्याची शक्यता नाही. परंतू क्रीडा संकूल परिसरात पालिका प्रशासनाने वृक्षारोपण केलेले असल्यामुळे रोपट्यांसाठी ट्री गार्ड न लावता गेटला कुलूप लावून महिलांना क्रीडा संकूल परिसरात जाण्यास मज्जाव केलेला आहे. वृक्षप्रेम जोपासणाºया पालिका प्रशासनाने गौतम वॉर्डातील बालोद्यानाकडे मात्र दुर्लक्ष केलेले आहे. मालकीच्या नसलेल्या क्रीडा संकुलाला कुलूपबंद केलेले आहे.आरोग्य जपण्यासाठी येणाचा प्रसार करणारे केंद्र व राज्य सरकार पालिका प्रशासनाला क्रीडा संकुल कुलूपबंद ठेवण्याची परवानगी कशी देते, हे समजण्यास मार्ग नाही. महिलांचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी यांना भेटले असता कुलूप उघडून देण्यास स्पष्ट नकार दिला. जेव्हा कुलूप उघडलेले असेल तेव्हा व्यायामासाठी जाण्याचा सल्ला दिला. व्यायाम दिवसभर करायचा नसतो हे मुख्याधिकारी यांना कोण समजावून देणार, हाही एक प्रश्न आहे.क्रीडा संकुल परिसरातील गेटला क्रीडा विभागाने कुलूप लावलेले नाही. खेळाडूंना व व्यायाम करणाºया स्त्री-पुरुषांना परिसराचा उपयोग झाला पाहिजे, याची काळजी घेतली जाईल.- भाग्यश्री बिलेजिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा
तालुका क्रीडा संकूल कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 11:12 PM
क्रीडा क्षेत्रात राज्य प्रगतीपथवर जावे यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
ठळक मुद्देमहिलांना व्यायाम करण्यास मनाई : पवनी येथील प्रकार