शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

अतिक्रमणाच्या विळख्यात तलाव

By admin | Published: March 27, 2016 12:19 AM

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे. नगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषद मालकीचे तलाव आहे.

दुर्लक्ष : मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम, लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?अशोक पारधी पवनी भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे. नगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषद मालकीचे तलाव आहे. त्यासर्व तलावावर सभोवताल लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. भोईतलाव, बालसमुद्र व कुऱ्हाडा असे तीन महत्वाचे तलाव पालिका क्षेत्रात आहेत. तीनही तलाव अतिक्रमणाचे विळख्यात जखडलेले आहेत.भाईतलाव वॉर्डात असलेले भाईतलाव हे तलाव जि.प. च्या मालकीचे आहे. लक्षावधी रूपये खर्च करून शासनाने रोजगार निर्मिती करून तलावाचे खोलीकरण केले. मत्स्य उत्पादनासाठी तलाव वापरात आहे. गेल्या १० वर्षापूर्वी तलाव सर्व बाजूने दिसत होते. आता मात्र पाळीवर चढल्यानंतर सभोवताल अतिक्रमण झालेले तलाव पाहता येते. सर्व बाजूला अतिक्रमण असल्याने तलावात पाणीसाठा वाढवू शकत नाही त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होत आहे. प्रसिद्ध असलेल्या परकोटाचे पायथ्याशी बालसमुद्र नावाचे तलाव आहे. एका बाजूला पुरातन असलेली मातीची भिंत (टेकडी) म्हणजेच तलावाची पाळ आहे. दुसऱ्या बाजुला जगन्नाथ मंदीर, चंद्रमनी विहार व पर्यटन संकूल आहे. उर्वरित दोन बाजूवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे.पवनी-निलज रस्त्याचे बाजुला प्रसिद्ध असलेले कुऱ्हाडा तलाव. तलावाचे पाळीवर लोकांनी राहत्या घरासाठी व लहान लहान उद्योगासाठी अतिक्रमण केलेले आहे. तलावाची दुसरी बाजू म्हणजे बस्तरवारी व बेलघाटा वॉर्ड. या भागात लोकांनी रहाण्यासाठी घर बांधताना तलावाचे मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. या तलावाचे खोलीकरणासाठी शासनाने लक्षावधी रूपये खर्च केले परंतू पाणीसाठा वाढविण्यासाठी खोलीकरणाचा उपयोग झालेला नाही. कारण जिथे पाणी पसरावा अशाच ठिकाणी अतिक्रमण करून लोकांनी घर बांधलेले आहेत. भरघोष मत्स्य उत्पादनासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भविष्यात तलावाचा पाणीसाठा कमी होवून त्याचा मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.