लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या महत्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. या अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.रोपे उपलब्ध व्हावे म्हणून वनविभागाने ‘रोपे आपल्या दारी’ ही योजना आणली असून १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपवनसरंक्षकांनी केले आहे. वनविभाग, सामाजिक वनविकास महामंडळ, राज्य व केंद्र शासनाचे इतर विभाग सर्वांना या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे. हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता ही लोकचळवळ व्हावी व हे ईश्वरीय कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांना यात सहभागी होता व्हावे म्हणून हरित सेना अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.शासनाच्या रोपे आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी तसेच वनविभाग व सामाजिक वनीकरण मधील रोपवाटिकेत रोपे विक्रीकरीता स्टॉल लावण्यात आलेले आहेत.रोपवाटिकेत आंबा, गुलमोहर, पेल्टोफोरम, सप्तपर्णा आवळा, चिंच, जांभूळ, अमलतास, कॅशिया, निलगीरी, कडुनिंब, बकेन, सिताफळ, करंज, वड, शेवगा, मोहा, कवट, बेहडा, हिरडा, पिंपळ, बांबु, साग, शिवन, रेनट्रो, शिसू आदी प्रजातींची रोपे उपलब्ध आहेत. शासनामार्फत वनमहोत्सव सदर रोपे १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दराप्रमाणे स्टॉलवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सदर ‘ रोपे आपल्या दारी’ योजनेचा लाभ घेवून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी असे आवाहन उपवनसरंक्षक विवेक होशिंग यांनी केले आहे.
जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:13 PM
राज्य शासनाच्या महत्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. या अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
ठळक मुद्देरोपे आपल्या दारी योजना : नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न