मुखरु बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी व्हावी यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. लिंक फेलमुळे दिवसाला २ ते ३ अर्ज संगणक स्वीकारत असल्याने शेतकºयांना सपत्नीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही अगतिकता तरूणाईला पाहून न झाल्याने स्वखर्चातून संगणक सेवा सुरू करून शेतकºयांना सेवा पुरवित आहेत. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील तरुणांनी स्वत: सेवा सुरु करून २५० शेतकºयांनी या सेवेचा लाभ दिला आहे.ग्रामीण भागात संगणक सेवेतील नेटवर्क सेवा कोलमडलेली आहे. प्रशासनाला कळवूनही सेवेत सुधारणा नसल्याने काम खुपच संथ गतीने सुरु आहे. राज्य शासनाने १५ सप्टेंबर अंतिम तारीख ठेवल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. शेतकरी दिवसा कामे न होत नसल्यामुळे रात्रीही सपत्नीक हजर राहून कर्जमाफी अर्ज भरत आहे. विविध सेवा सहकारी संस्था अंतर्गत कर्जमाफीचे अर्ज भरून आॅनलाईनकरिता मिळत आहेत. मात्र इतर बँकांकडून अर्ज मिळत नसल्याने बँकांकडून घेतलेले कर्ज माफ होणार की नाही याबाबत साशंकता आहे.शेतकºयांच्या कर्जाची संपूर्ण माहिती बॅक, उपनिबंधक कार्यालयात आहे. आॅनलाईन कर्जमाफीत संगणकाची सेवा तत्पर नसल्याने काम संथगतीने होत आहे. ही शेतकºयांची चेष्टा आहे. उद्योगपतींचे कर्ज एका झटक्यात माफ होते. तर शेतकºयांचे का नाही असा प्रश्न चर्चिला जात आहे. जेवनाळा येथे आॅनलाईन सेवा शून्य खर्चात तत्पर करण्याकरिता सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल गोंदोळे, जेष्ठ नागरिक विठ्ठल गोंदोळे, संस्थेचे शिपाई संभू लुटे व संगणक चालक भारती हरडे यांनी सहकार्य केले आहे.शेतकरी देशाचा आधार असून त्याचा सन्मान जपला पाहिजे. शासन कर्जमाफीकरिता सरसावला असताना तांत्रिक अडचणी येत आहेत. ज्यांना सेवा पुरविणे शक्य आहे त्यांनी कर्तव्य समजून पुढाकार घ्यावा व शेतकºयांना आॅनलाईन कर्जमाफीत सहकार्य करावे.-नितीन रणदिवे, सामाजिक कार्यकर्ता जेवनाळा
कर्जमाफी अर्जाकरिता तरूणाईचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:10 AM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी व्हावी यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. लिंक फेलमुळे दिवसाला २ ते ३ अर्ज संगणक स्वीकारत असल्याने शेतकºयांना सपत्नीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : सर्व्हर फेलमुळे त्रास वाढला