मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल : प्रकरण पत्रिकेवर उलटे ध्वज छपाईचेतुमसर : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर उलटे ध्वज छापल्याप्रकरणी चौकशी न करता मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने पोलिसांविरोधात नगर परिष्० कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम पत्रिका रमाई डिझायनर अॅण्ड आॅफसेट प्रिंटर्सकडे दिले होते. पंरतु त्यांच्याकडे कार्यादेश नाही किंवा प्रुफ रिडींगचे तपासणी प्रमाणपत्रही नाही. दरम्यान तेथून पत्रिका छापल्या व न.प.च्या कर्मचाऱ्यांना आणून दिल्या. प्रजासत्ताक दिन असल्याने पत्रिका वाटणे सुरु असतांनाच चुक लक्षात आल्याने त्या वाटप पत्रिका परत घेण्यात आल्या. अमित चौधरी नामक एका व्यक्ती पोलिसांत तक्रार केल्याने पोलिसांनी ते प्रकरण चौकशीत न ठेवता तडकाफडकी गुन्हा दाखल केला.प्रशासकीय अधिकाऱ्या विरोधात एखादी तक्रार झाल्यास ते प्रकरण चौकशी ठेवणे व दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करणे असे असतांना देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करणे म्हणजे कुठेतरी पाणी मुरते? या संशयाला बळकटी मिळाल्याने तुमसर पालिकेचे ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारुन पोलिसांना गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निवेदनही दिली. यावेळी पालिकेचे नगराध्यक्षसह नगरसेवक गावातील गणमान्य नागरिक तसेच न.प. चे कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
तुमसर पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By admin | Published: January 30, 2016 12:43 AM