शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

दुचाकी अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:17 AM

दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देभंडारा-पवनी मार्गावरील घटना : दीड महिन्यापूर्वी झाले होते समायोजन

आॅनलाईन लोकमतमानेगाव (बाजार) : दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक महिला गंभीररीत्या जखमी झाली. स्वाती मिलिंद घाटे (५०) रा.सहकारनगर भंडारा असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.स्वाती घाटे या चैतन्य विद्यालय मानेगाव येथे कार्यरत होत्या. दीड महिन्यापूर्वीच भंडारा शहरातील नूतन महाराष्ट्र विद्यालयातून त्यांचे समायोजन मानेगाव येथील चैतन्य विद्यालयात झाले होते. मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर त्या दुचाकीने भंडाराकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत विजयता यादव या होत्या. सिल्लीजवळील पटाच्या दाणीजवळ विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीस्वाराने घाटे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात घाटे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घाटे यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.या अपघातात यादव या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कारधा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात हलविले. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीचालक तरूणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. बुधवारला दुपारी वैनगंगा नदीघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.सुमोच्या धडकेत दुचाकीचालक जखमीभंडारा : भरधाव सुमो चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने समोरून येणाºया दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सुमो रस्त्याच्या बाजूला उलटली. यात दुचाकीचालक गंभीररित्या जखमी झाला तर सुमोमध्ये बसलेल्या दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना मंगळवारला सकाळी सिल्ली येथे घडली.तेजराम अशोक ढोबळे (२३) रा.सिल्ली असे गंभीर जखमीचे तर छाया देवचंद वैद्य (३०) रा.माटोरा व संगीता शंकर मने (३०) रा.माटोरा असे जखमींचे नाव आहे.एमएच ३६ एच ३४३८ सुमो क्रमांकाचा चालक-मालक अरूण मस्के हा माटोरा येथील १० महिलांना धान कापणीकरिता सुमोने आणायला गेला होता. तिथून परतताना सिल्ली येथे भरधाव वेगात असलेल्या सुमोने समोरून येणाºया तेजराम ढोबळेच्या दुचाकी क्रमांक (एमएच ४० एजे ८५९२) ला जबर धडक दिली. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या सुभाष फुलबांधे यांच्या घराच्या भिंतीला आदळल्याने उलटली. यात दुचाकीचा चुराडा झाला. तेजराम ढोबळे हे गंभीररित्या जखमी झाले. सुमोमध्ये बसलेल्या छाया वैद्य व संगीता मने या दोन महिला जखमी झाल्या. जखमींना गावकºयांच्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. तेजरामची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कारधा पोलीस ठाण्यात सुमोचालक अरूण मस्के याच्याविरूद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार बहादुरे हे करीत आहेत.