शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

शिक्षकासाठी पालक एकवटले

By admin | Published: February 12, 2017 12:26 AM

तालुक्यातील खुटसावरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाच्या दीर्घकालीन वैद्यकीय रजेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

खुटसावरीत वर्ग चार, शिक्षक एक : आंदोलनाचा इशारा, नीलकंठ कायते यांची शाळेला भेटभंडारा : तालुक्यातील खुटसावरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाच्या दीर्घकालीन वैद्यकीय रजेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांना खुटसावरी येथे पाचारण करून त्यांच्या समोर समस्यांचा पाडा वाचला. निलकंठ कायते यांनी १५ दिवसात समस्या मार्गी लागेल, असे आश्वासन पालकांना दिले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुटसावरी येथे इयत्ता १ ते ४ मध्ये ३१ विद्यार्थी विद्यार्जनाचे धडे घेत आहेत. पटसंख्या कमी असल्यामुळे या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती असणे बंधनकारक आहे. मात्र सध्यस्थितीत येथील कारभार एका शिक्षिकेच्या खांद्यावर आहे. येथील मुख्याध्यापक गेडाम हे अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर रोजी किरकोळ रजा, १८ नोव्हेंबर ते १८ जानेवारीपर्यंत पुन्हा रजेवर गेले. १९ जानेवारीला ते शाळेत रूजू झाले. त्यानंतर मात्र २३ जानेवारीपासून पुन्हा वैद्यकीय रजेवर गेले आहे. त्यामुळे येथील शिक्षणाचा बोजवारा वाजला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने यासंदर्भात पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना ठराव दिला. मात्र नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या समस्येची जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांनी दखल घेत त्यांनी थेट शाळेला भेट दिली. उपस्थित पालकांशी त्यांनी चर्चा केली. शैक्षणिक नुकसानीमुळे पालकांनी कायते यांना धारेवर धरले. त्यांनी पालकांना मार्गदर्शन करून शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. लवकरच शाळेत नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले, तसे न झाल्यास पालकांसमवेत आंदोलनासाठी पुढाकार घेणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.दर्जेदार शिक्षण देणे ही शिक्षकांची व मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. शिक्षकांनी नवीन आव्हाने स्वीकारून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यासाठी शाळेला दोन शिक्षकांची नितांत गरज आहे. यावेळी सरपंच विजय वासनिक, शाळा व्यवस्थापन समितीचे सुनंदा बोरकर, करूणा बोरकर, पुष्पा बोळणे, हिरना बोरकर, रमा दिनकर, भुपेंद्र रामटेके, भगवान कडव, श्रीराम हारगुळे, राजु मांढरे, संगिता बोरकर आदी उपस्थित होते. सरपंच विजय वासनिक यांनी शाळेतील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच पुढाकार घेतला जातो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता अनेकदा पंचायत समितीला कळविण्यात आले आहे. आता ग्रामसभेचा व शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेवून पुन्हा तो शिक्षण विभागाला पाठविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी पालकांना दिला.शाळा शंभरटक्के प्रगत करण्यासाठी पालकांसह ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच विजय वासनिक यांनी केले. संचालन सहायक शिक्षीका पुनम राघोर्ते यांनी केले. आभार प्रदर्शन मंगला मस्के यांनी केले. (नगर प्रतिनिधी)जिल्हा परिषद सदस्यांना घेरावगडेगाव आगार ते खुटसावरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यासह अनेक समस्या ग्रामस्थांना भेडसावत आहेत. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी खुटसावरीतील नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांना घेराव घातला. संजय गांधी निराधार योजना यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा,यासाठी नेहमीच धावपळ करीत आहे. ज्यांना समस्या उद्भवतात त्यांनी माझ्याकडे रितसर अर्ज करून मला द्यावे, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन जि.प. सदस्य निलकंठ कायते यांनी ग्रामस्थांना दिला.