आदर्श उपक्रम
पवनी : पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या काकेपार येथील जिल्हा परीषद डिजीटल पब्लिक शाळेत वर्ग १ते ७पर्यंत शाळा आहे. मात्र शाळेत भौतिक सुविधांचा वानवा लक्षात घेत शिक्षकांनी मदतीचा हात दिला आहे. चंद्रपुर व नागपुर जिल्ह्याच्या सिमा लागून असलेला भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील गाव म्हणून काकेपार गाव ओळखला जातो. शाळेत भौतिक सुविधा असाव्यात यासाठी ही मदत असून याकडे समाजात अन्य नागरिकांसाठी आदर्श ठरणारा आहेौ
काकेपार शाळेत विविध मुल्यवर्धन उपक्रम राबविले जातात. नाविण्यपुर्ण विविध उपक्रमासह शालेय विकासासाठी तुटपुंजा निधी उपलब्ध होतोौ यावर मात करण्यासाठी काकेपार शाळेतील मुख्याध्यापक विलास गिरी, शाळेतील शिक्षक मुरारी कढव, चंपा केदारे, हिरालाल वाकडे यांनी शाळेच्या प्रगतीकरीता,शाळेच्या विकासाकरीता आर्थिक मदत देण्याचे ठरविले. शाळेतील शिक्षक मुरारी कढव यांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विनायक मालोदे यांच्याकडे शालेय विकासाच्या दृष्टिने दहा हजार रूपये देण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य रामराव जांभुळे, घोडमारे,माजी अध्यक्ष रामभाऊ मालोदे,जगदिश मालोदे,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.सर्वच परीसरातुन काकेपार शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक होत आहे. यापासुन इतरांनीही प्रेरणा घ्यावी व शालेय विकासाकरीता हातभार लावावे,असे आवाहन करण्यात आले आहे.