जवाहरनगर : परसोडी (ठाणा) येथे ओम सत्यसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात शिक्षक-पालक विद्यार्थी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसचिव चंद्रशेखर गिरडे, नासिक चवरे, प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील उपस्थित होते. चंद्रशेखर गिरडे यांनी विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीचे संधीत रूपांतर करण्याचे आवाहन केले.
या वेळी शिक्षक-पालक संघाची समिती गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील, उपाध्यक्ष पालक प्रतिनिधी नाशिक चवरे, सचिव प्रा. अरविंद डोंगरे, सहसचिव गजानन वैद्य यांची नेमणूक करण्यात आली. तर सदस्यपदी प्रा. ममता वाडीभस्मे, प्रा. दर्शना गिरडे, प्रा. वर्षा भुरे, प्रा. ज्योती रामटेके, प्रा. महादेव हटवार, प्रा. मिथुन मोथरकर, विद्या रामटेके, मनीषा झलके, रमेश मानकर, मंगला नांदगावकर, देवचंद माळी यांची नेमणूक करण्यात आली. प्रास्ताविक दिलीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती रामटेके यांनी तर आभार प्रा. प्रतीक घुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हर्षानंद वासेकर, प्रा. वर्षा दंडारे, प्रा. प्रगती सुखदेवे, प्रा. सोनल गभने, प्रा. घाटोळकर, प्रा. गिरी, प्रा. वर्षा भुरे, शिक्षकेतर कर्मचारी राजेश चोपकर, तुलाराम वासनिक, दीपक आकरे, चंदा शेंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ने करण्यात आली.