शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असताे. शिक्षक हा संवेदनशील असल्याने समाजातील बऱ्यावाईट घटनांचे भान त्याच्या लवकर लक्षात येते. शाळेतून बाहेर आल्यावर ताे समाज शिक्षक असताे. याच जाणिवेतून काेराेना काळात निशिकांत बडवाईक यांनी रुग्णसेवा केली. शिक्षकदिनी भलेही त्यांना पुरस्कार मिळणार नाही, परंतु काेराेनारुग्ण रुग्णालयातून ठणठणीत बरा हाेऊन परत आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पुरस्कारापेक्षाही माेठे आहे, असे निशिकांत बडवाईक सांगतात.
बाॅक्स
रुग्णाचा फाेन आला की कार ॲम्बुलन्स दारात
निशिकांत बडवाईक सांगतात काेराेना काळात ग्रामीण भागातून कुणाचाही फाेन आला की, आपली कार ॲम्बुलन्स अवघ्या काही वेळात त्याच्या दारात उभी राहत हाेती. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतरच समाधान लाभत हाेते. या काळात स्वत:ची काळजी घेण्यासाठी आपण पीपीई कीट घेतली. चालकालाही याेग्य मार्गदर्शन केले. श्रीमंतांना सहज वाहन उपलब्ध हाेते. मात्र गाेरगरिबांचे काय या जाणिवेतून आपण ही सेवा केली. त्यात आपण माेठे काहीच केले नाही, असे विनम्रपणे निशिकांत बडवाईक सांगतात.