आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : शिक्षक सहलीवर व शाळा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील मुंढरी (बुज.) येथील नूतन विद्यालयात मंगळवारला दिसून आला. मुख्याध्यापक शिक्षकांत भेदभावपूर्ण व्यवहार करीत असून मर्जीतील शिक्षक अर्ज देऊन गैरहजर राहत असताना दुसऱ्या दिवशी त्यांची रजिस्टरवर हजेरी लावली जाते, असा आरोप के.डब्ल्यू. खोब्रागडे या शिक्षकाने करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंढरी येथे ५ ते १० मध्ये २९५ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापकांसह पूर्ण वेळ शिक्षक ९, तासिकेवरील ३, निदेशक ३ असे १५ शिक्षक कार्यरत आहेत. १६ जानेवारी रोजी शैक्षणिक सहल नागपूर येथे नेण्यात आली. सहलीला ४० विद्यार्थी गेले. उर्वरीत २५५ विद्यार्थ्यांसाठी सकाळपाळीत शाळा ठेवण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी सहल असताना त्या सहलीला पूर्ण वेळ शिक्षकांपैकी मुख्याध्यापकांसह ६ शिक्षक गेले. तासिकेवरील २ शिक्षक व विषय निदेशक १ व परिचर असे १० जण गेले. सहलीच्या नावावर शाळा वाऱ्यावर सोडण्यात आल्यामुळे सहल शिक्षकांसाठी की विद्यार्थ्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळ पाळीची जबाबदारी आर.डी. बंसोड यांचेकडे सोपविण्यात आली. त्यांच्या सोबतीला आर.डी. बंसोड, के.डब्लू. खोब्रागडे, डी.एच. बघेले, कर्मचारी डी.एल. उईके, लिपीक लांजेवार, निदेशक गोंधुळे, भडके उपस्थित होते.ऋती कुंभरे व प्रिती बांडेबुचे या विद्यार्थिनींना विचारले असता, आम्ही दररोजच स्वत:च वर्ग व परिसराची सफाई व स्वच्छता करीत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शाळेत कोणत्याही प्रकारचे भेदभावपूर्ण काम केले जात नाही. शैक्षणिक सहल असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षक आले आहेत. यासंबंधी अधिक माहिती शाळेत आल्यावर देण्यात येईल.- हेमराज दहिवले, मुख्याध्यापक नूतन विद्यालय मुंढरी.साफसफाईसाठी चार कर्मचारी असून विद्यार्थ्यांकडून साफसफाई केली जात नाही. शाळेत नेहमी भेट दिली जाते. हजेरी रजिस्टर तपासले जातात. शिक्षक खोब्रागडे सांगत असलेली माहिती चुकीची आहे.-सरिता चौरागडे, जि.प. सदस्या मुंढरी.
शिक्षक सहलीवर, शाळा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:24 PM
शिक्षक सहलीवर व शाळा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील मुंढरी (बुज.) येथील नूतन विद्यालयात मंगळवारला दिसून आला.
ठळक मुद्देमुंढरीबुज शाळेतील प्रकार : चौकशी करून दोषीविरूद्ध कारवाईची मागणी