चंद्रप्रकाश दुरुगकर यांचे प्रतिपादन : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ‘शिक्षणाची वारी’चे उद्घाटनजवाहरनगर : शिक्षण क्षेत्रात वावरत असताना मनात स्वार्थी भावना नसावेत. मराठी माध्यमापेक्षा इतर माध्यमाच्या शाळा काय करत आहे हे पाहण्यापेक्षा आपण काय करू शकतो यावर जास्त भर दिले तर शिक्षण किंबहुना पटसंख्येत वाढ होईल. यासाठीच आपला दृष्टिकोन सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी केले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र द्वारे ज्ञान रचनावाद तंत्रस्नेही शाळा अंतर्गत शिक्षणाची वारीचे चिखल जिल्हा परिषद शाळेत उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्र्रकाश दुरुगकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच चोलाराम गायधने हे होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी एच.एच. तिडके, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कविता पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकिशोर वाघमारे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष देवा वाघमारे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अशोक आकरे, पोलीस पाटील तुळशीदास गायधने, अध्यक्ष अशोक आकरे, विष्णूदास हटवार, दादा उके उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात सरपंच चोलाराम गायधने म्हणाले, स्पर्धेच्या युगात दर्जेदार शिक्षण मिळाले तर मराठी शाळा प्रगत होतील यात दुमत नाही. शैक्षणिक योजना प्रत्येक पालकांच्या दारी पोहचावे यासाठी प्रगत महाराष्ट्राचे विचार शिक्षकांच्या डोक्यात रूजविले तर यश शक्य. याप्रसंगी सकाळी चिखली येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची वारीचे प्रारंभ झाले. गावामधून शिक्षणाचे महत्व पटवून देणारे असर फाउंडेशनचे कलाकारांनी पथनाट्याद्वारे समजावून सांगितले. या वारी (पालखी) सोबत ग्रामपंचायत, तंटामुक्ती समिती, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावामधून ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. ही शैक्षणिक वारी (पालखी) खरबी (नाका), खराडी, राजेदहेगाव, परसोडी, ठाणा, सावरी, कोंढी, लोहारा, साहुली, पिपरी, चिचोलीमार्गे पेवढा येथील जिल्हा परिषद शाळेत पोहचली. ठिकठिकाणी शैक्षणिक वारीचे जल्लोषात जिल्हा परिषद शाळेनी स्वागत केले. विविध शाळेत व गावातील चौकाचौकात मराठी शाळेत इंग्रजी माध्यमाचे शैक्षणिक सत्राची सुरुवात होत आहे. याच शाळेत शिक्षण कसे दर्जेदार मिळते, पिज्जा नुडल्स ऐवजी झुणका भाकरीची गोडवी कशी याविषयी पथनाट्याद्वारे नागरिकांना समजावून सांगितले व मराठी माध्यमाच्या शाळेतच शिक्षण घ्यावे असे सांगितले. प्रास्ताविक ठाणाचे केंद्रप्रमुख वसंत साठवणे यांनी केले. संचालन पवन येवले यांनी केले. (वार्ताहर)
शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक असावा
By admin | Published: March 28, 2016 12:25 AM