तीन महिन्यांचे वेतन थकीत : आॅनलाईन प्रणालीचा फटकाभंडारा : आॅनलाईन प्रणालीमुळे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे. तीन महिन्याचे सुमारे ५ कोटी ४० लाखांचे वेतन थकीत आहे. वेतनाच्या मागणीसाठी शिक्षकांनी आजपासून खळू-फळा बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील ५१४ शिक्षक व १९४ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत जिल्हा परिषदच्या अंतर्गत ३० माध्यमिक शाळा सुरू आहेत. यात ११ कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये ५१४ शिक्षक तर १९४ शिक्षकेत्तर कर्मचारी असे ७०८ कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालय तथा खासगी विद्यालयातील शिक्षकांचे वेतन प्रक्रियेत शिक्षण विभागाने बदल करून ते आॅनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून संगणकाच्या माध्यमातून करण्याचे नियोजन केले. त्यानुसार, सर्वांना संगणकावर त्यांची अद्यावत माहिती नमूद रकाण्यात भरावी लागते. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनाची ग्रँड प्राप्त झाली आहे. मात्र आॅनलाईनच्या प्रक्रियेमुळे त्यांचे मार्च महिन्यापासूनचे वेतन रखडले आहे. मागील तीन महिन्यापासून वेतन थकित असल्याने भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने याबाबत शिक्षण विभागाला निवेदन दिले. मात्र, वेतन प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी संघटनेने सोमवारपासून 'खळू-फळा बंद' आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य शिक्षकांनी केले नाही. शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थी दिवसभर शाळेच्या मैदानात खेळताना दिसून आली. (शहर प्रतिनिधी)तिसऱ्या दिवशीच ‘दे धक्का’२६ जूनपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. सोमवारी शाळेचा तिसरा दिवस असताना शिक्षकांनी तीन महिन्यांच्या वेतनासाठी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ७०८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तीन महिन्याच्या वेतनापोटी ५ कोटी ४० लाखांचे वेतन अदा करावयाचे आहे.
शिक्षकांनी केले कामबंद
By admin | Published: June 30, 2015 12:45 AM