शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Published: January 23, 2017 12:25 AM

जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली निघालेल्या नाहीत. चार महिन्यापूर्वी यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

शिक्षक कृती समितीचा ठराव : जिल्हा परिषद प्रशासनाला दिला ७ फेब्रुवारीपर्यंत अल्टीमेटमभंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली निघालेल्या नाहीत. चार महिन्यापूर्वी यासाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे ७ फेब्रुवारीपर्यंत प्रलंबित समस्या निकाली काढाव्या, अन्यथा ९ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्व शिक्षक काम बंद आंदोलन करतील असा इशारा आज झालेल्या शिक्षक कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावातून देण्यात आला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या एक ना अनेक समस्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. याकरिता मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांनी आंदोलन, मोर्चे व निदर्शने करून त्यांच् या समस्या सोडविण्याची विनवणी प्रशासनाला केली. मात्र त्यांच्या समस्यांकडे कुणीही लक्ष देत नसल्याने चार महिन्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी काम बंद आंदोलन करून प्रशासनाला हादरवून सोडले. त्यांच्या समस्यांचे निवेदन देण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी आले नाही किंवा त्यांना भेटण्यासाठी वेळही दिली नव्हती. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध असंतोष उफाळला होता. दरम्यान त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाल्याने खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकाराने मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झोली नाही. चार महिन्यांचा कालावधी लोटला असून या मागण्या ७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने निकाली काढून शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी शिक्षक कृती समितीने केली आहे. याकरिता शिक्षक कृती समितीचे आज दुपारी शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात सभा घेण्यात आली. यात मागण्या मान्य न झाल्यास ९ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा ठराव पारित करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षक आमोरे सामोरे उभे ठाकणार आहेत. या सभेला कृती समितीचे अध्यक्ष मुबारक सय्यद, रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी या शिक्षक नेत्यांसह अनेक शिक्षकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)