भंडारा : पुनर्रचित शालेय अभ्यसक्रमाचे प्रशिक्षण यावर्षी प्रायोगिक तत्वावर आॅनलाईन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यभरात एकाचवेळी हे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे. त्यामुळे आता राज्यावरुन जिल्हा आणि तालुकास्तरावर दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची साखळी पध्दत या सत्रापासून बंद होणार आहे.शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाची पाठ्यपुस्तके बदलविण्याचा निर्णय पाठयपुस्तक महामंडळाने घेतला आहे. यात पहिल्या दोन वर्षात पहिली ते चौथीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलला. सत्र २०१५-१६ या वर्षात पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. अभ्यासक्रम बदललेल्या वर्गाच्या शिक्षकांना शैक्षणिक वर्षे सुरु होण्यापूर्वी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशात विज्ञानाने केलेली क्रांती व शासनाच्या संगणक प्रणालीमुळे हे प्रशिक्षण यावर्षी आॅनलाईन होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण पुणे येथून शिक्षकांना दिले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)असा झाला पध्दतीत बदलनवी पध्दतपुणे येथील मुख्य कार्यालयातून हे प्रशिक्षण तज्ज्ञांच्या माध्यमातून संबंधित शिक्षकांना दिले जाईल. यासाठी मुंबई आय.आय.टी.तून हे सॉफटवेअर तयार केले आहे. ते प्रत्येक जिल्हयातील केंद्रावर कॉम्पयुटरमध्ये अपलोड केले जाईल. यासाठी म् अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाईल.जुनी पध्दतज्यावर्गाचा अभ्यास क्रम बदलणार त्या शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी पुणे येथे होणाऱ्या प्रशिक्षणात डाएट चे प्राध्यापक सहभागी होतात. त्याच्या माध्यमातून जिल्हास्तरावर प्रशिक्षण झालेले तज्ञ शिक्षक तालुकास्तरावरील शिक्षकांना प्रशिक्षण देतात.
शिक्षकांना मिळणार आॅनलाईन प्रशिक्षण
By admin | Published: April 15, 2015 12:44 AM