लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : पावसाळा तोंडावर आहे. शाळा सुरु व्हायला अजून एक महिना शिल्लक आहे. पण, शासनाने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शाळा व परिसरात खड्डे खोदण्याचा फतवा शिक्षण विभागाच्या प्रशासनाने काढले आहे.दरवर्षी १ जुलै ते ३१ जुलै या काळात वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम घेतला जातो. प्रचार अन् प्रसार करण्यासाठी मोठ्या स्तरावर रुपये खर्ची घातले जातात. त्या खर्चाचे पद्धतशीर नियोजन केले जात असते. पण शाळांना किंबहुना शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या कमाईतून पैसा वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी दरवर्षी खर्च होतो. खड्डे करण्याचे निर्देश प्रशासनाने शाळा मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्या निर्देशांचे पालन आज्ञा म्हणून मुख्याध्यापक करीत आहेत. शिक्षक व मजुरांकरवी झाडे लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरु अनेक शाळांमध्ये सुरु आहे.खड्डे खोदण्याचा खर्च त्यानंतर वृक्ष खरेदीचा व इतर कार्यक्रमावर येणार खर्च शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उचलत आहेत. शासनाकडून एक दमडीही शाळांना दिली जात नाही. ज्या शाळा हरित सेनेत समाविष्ठ आहेत अशा सर्व शाळांना दोन हजार पाचशे रुपये दिले जायचे. आता त्या निधीत एक हजार रुपयाची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करण्याचा खर्च पेलवला जाणार आहे. हा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. शासनाने वृक्ष लागवड करण्यासाठी शाळेत खड्डे खोदण्यासाठी अनुदान द्यावा किंवा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांद्वारे खड्डे खोदण्याचे काम करण्यात यावे. तसेच शाळांना वृक्ष लागवड करीता रोपे मोफत पुरविली जावी. त्या वृक्षांना संरक्षण देण्यासाठी खासगी व जिल्हा परिषद शाळांना ट्री गार्ड पुरविण्यासाठी खासदार, आमदार व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निधीतून साहित्य देण्यात यावे. झाडे लावा व जगवा असे सांगितले जाते. पण, उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची भीषण टंचाई असते.अनेक शाळात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी जिल्हा परिषद शाळांसह खासगी शाळांत पाणी टंचाई भेडसावते. तिथे हातपंप / विद्युत बोअरवेल देण्याची योजना राबविण्यात यावी.मोहाडीतील काही खासगी शाळांनी हातपंप / विद्युत बोअरवेल देण्यासाठी अर्ज केला. त्यांच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. अनेक शासनाच्या महत्वपूर्ण योजनेत खासगी व जिल्हा परिषद असा अंतर केला जातो. विविध योजनेतील मिळणारी खासगी शाळांना मिळणारी सापत्न वागणूक बंद केली जावी अशी मागणी केली गेली आहे. तथापि वृक्ष लावण्यासाठी भर उन्हात गुरुजी खड्डे खोदण्याच्या कामाला लागल्याची सध्या चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरु आहे.
शिक्षक खड्डे खोदण्याच्या कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:43 PM
पावसाळा तोंडावर आहे. शाळा सुरु व्हायला अजून एक महिना शिल्लक आहे. पण, शासनाने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शाळा व परिसरात खड्डे खोदण्याचा फतवा शिक्षण विभागाच्या प्रशासनाने काढले आहे.
ठळक मुद्देशिक्षण विभागाचा फतवा : शासनाकडून शाळांना एक दमडीही नाही