लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वसमावेश तरतुदी करुन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क प्रदान केले आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज या ठिकाणी जेवढया माहिला उपस्थित आहेत, त्यांच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. थोर पुरुषांची जास्तीत जास्त माहिती वाचावी, बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा असा दिलेला मुलमंत्र सर्वांनी अंगिकारावा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केले.डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन सामाजिक न्याय भवनात करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, उपस्थित होते. विनीता साहू पुढे म्हणाल्या की, फक्त पुस्तक वाचन करुन शिक्षण पूर्ण होत नाही, तर ते अनुभवातून पूर्ण होते. माणसाने स्वत:ची ओळख तयार करायला पाहिजे. माणूसकीची ओळख जपा, स्वत:वर विश्वास ठेवा. जीवन संघर्षमय आहे, जीवनात खुप चढ-उतार असतात त्यांचा सामना करा. आपण स्वत:साठी खूप जगलेत आता देशासाठी, समाजासाठी व इतरांसाठी जगा. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगिकारा, असे त्यांनी सांगितले. यावेळी अमित मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या मौलिक कार्यावर प्रकाश टाकून त्यांनी भारतीय राज्य घटनेद्वारे समतेसाठी लढा उभारला असल्याचे सांगितले.प्रास्ताविक करतांना आशा कवाडे यांनी सांगितले की, भारतीय राज्य घटनेमध्ये दलित समाज पुढे येण्यासाठी तरतूद केलेली आहे. त्यामाध्यमातून मागासवर्गींयांचा विकास व्हावा याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय समाजाचा बौध्दीक व शारिरिक सार्वांगिण विकास व्हावा याकरीता व्यसनमुक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.विद्यार्थ्यांकरीता समता दूतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनावर गीत सादर केले. तसेच ओयॉसिस कोचिंग क्लासेसचे संचालक नंदेश्वर यांनी विद्यार्थ्यांसाठी करीअर गाईडन्सचा कार्यक्रम घेतला. संचालन समाज कल्याण निरिक्षक पराग वासनिकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार गृहपाल रजनी वैद्य यांनी मानले. या कार्यक्रमास समाजकार्य महाविद्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेतील कर्मचारी, समता दूत, विद्यार्थी व बी.व्ही.जी. कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगिकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:48 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वसमावेश तरतुदी करुन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क प्रदान केले आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज या ठिकाणी जेवढया माहिला उपस्थित आहेत, ....
ठळक मुद्देविनीता साहू : सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ