भंडारा : सबकुछ ‘आॅनलाईन’च्या युगात भंडारासारख्या लहान शहरांतील ‘टीनएजर्स’देखील ‘स्मार्ट’ होत आहेत. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बहुतांश ‘टीनएजर्स’चा ओढा हा ‘सोशल नेटवर्किंग साईट्स’कडे आहे. भंडारातील ४२ टक्के म्हणजेच १० पैकी ४ ‘टीनएजर्स’ आजच्या तारखेत ‘सोशल नेटवर्किंग’मध्ये ‘अॅक्टिव्ह’ आहेत. परंतु इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत भंडाऱ्याची टक्केवारी मागे आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. ‘टीसीएस’तर्फे देशातील १२ ते १८ या वयोगटातील ‘टीनएजर्स’च्या ‘डिजिटल लाईफस्टाईल’ बाबत सर्वेक्षण करण्यात आले. यात देशातील ‘मेट्रो’ शहरांसोबत एकूण १४ शहरांतील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता. यात विद्यार्थ्यांना ‘सोशल मीडिया’च्या संदर्भात विविध मुद्यांवर विचारण्यात आले होते. यानुसार नागपुरातील शाळांमधील ७६.७ टक्के विद्यार्थी हे ‘सोशल मीडिया’चा वापर करतात. मोठ्या शहरांसोबतच हैदराबाद, कोईम्बतूर, इंदोर, भुवनेश्वर, कोची, लखनौ या शहांच्या तुलनेत ही टक्केवारी फारच कमी आहे. सर्वेक्षणात नागपूर सर्वात शेवटच्यास्थानी आहे. सर्वात जास्त ९२.३ टक्के टक्केवारी भुवनेश्वर शहराची आहे.पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकताविद्यार्थी ‘सोशल नेटवर्किंग साईट्स’च्या माध्यमातून नेमके काय करत आहेत यावर अर्धेच पालक लक्ष ठेवून असतात. सर्वेक्षणानुसार ५१.२ टक्के पालकच यासाठी पुढाकार घेतात. यातील ५१.१ टक्के पालकांनाच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ‘अकाऊंट’चा ‘पासवर्ड’ माहिती आहे.‘आॅनलाईन शॉपिंग’बाबत निरुत्साहदेशातील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत ‘आॅनलाईन’ खरेदी करण्यात नागपुरातील ‘टीनएजर्स’ मागे आहेत. इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी केवळ ५३ टक्के विद्यार्थी ‘आॅनलाईन शॉपिंग’ करतात. इतर सर्वच शहरांत हाच आकडा ६० ते ७० टक्क्यांच्या वर आहे. सर्वात जास्त ५५.४ टक्के खरेदी ही पुस्तकांची होते. तर ५३.९ टक्के ‘टीनएजर्स’ गॅजेट्सची खरेदी या माध्यमातून करतात. त्यापाठोपाठ ‘ट्रॅव्हल’ तिकीट (३७.८ %) व सिनेमाच्या तिकिटांवर (३२.९ %) भर आहे. ‘फेसबुक’, ‘गुगल+’ला पसंतीनागपुरातील ‘टीनएजर्स’कडून सर्वात जास्त उपयोग ‘फेसबुक’चाच करण्यात येतो. ‘सोशल मीडिया’चा वापर करणारे ८५ टक्के विद्यार्थी ‘फेसबुक’ वापरतात. तर त्याखालोखाल ‘गुगल+’ (५९.७%) व ‘टिष्ट्वटर’चा (३६.४%) क्रमांक लागतो.स्टडी सोशल मीडियानागपुरातील ‘टीनएजर्स’ शाळेतील विविध ‘असाईनमेन्ट’ पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात ‘सोशल नेटवर्किंग साईट्स’चा उपयोग करतात. अशा विद्यार्थ्यांची संख्या ४९.२ टक्के आहे. तर ४४.७ टक्के विद्यार्थी नातेवाईक व मित्रमंडळींशी ‘कनेक्ट’ होण्याकरिता हा वापर करतात.
‘डिजिटल लाईफस्टाईल’मध्ये ‘टीनएजर्स’ पिछाडीवर
By admin | Published: June 10, 2015 12:33 AM