बॉक्स
बँकेचे तहसीलकडे तर तहसील बँकेकडे बोट दाखवते
त्यानंतर चिखली येथील शेतकरी विष्णू हटवार यांनी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी बँकेत जाऊन याची स्वतः खातरजमा केली. त्यावेळी पुराची रक्कम भंडारा तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे बँकेने सांगितले. त्यानंतर तहसीलमध्ये विचारणा केली तर अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. एकीकडे बँक तहसीलकडे बोट दाखवते तर तहसील कार्यालय बँकेकडे बोट दाखवते. अशा अवस्थेत बळीराजाने करायचे तरी काय, असा प्रश्न आहे. आम्हाला मानसिक त्रास होत असून आता शेवटचा उपाय म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांच्या दारासमोरच आम्ही उपोषणाला बसणार असल्याचे मदतीपासून वंचित शेतकरी जीवन हटवार, होमदास गायधने, नारायण गायधने, अनिल बोरकर, रत्नमाला बोरकर, वासुदेव मोहरकर, कौशल्या मोहरकर, इस्तारी मोहरकर या शेतकऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
भंडारा तालुक्यातील चिखली, खरबी येथील अनेक शेतकरी हे वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारतात. मात्र, तहसील कार्यालयातील काही अधिकारी हे स्वतःची जबाबदारी झटकून वेगवेगळी कारणे देत आहेत. मदत मिळाली नसल्याने शेतकरी वारंवार विचारणा करण्यासाठी येतात. मात्र, त्यांची दखल घेतली जात नाही. याकडे तहसीलदारांचेही दुर्लक्ष होत आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे महसूलचे अधिकारी बळीराजाच्या मदतीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप चिखली येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
कोट
सरकारचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नाही. तहसीलदारांनी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. गत सहा महिन्यांपासून मी स्वतः याचा पाठपुरावा करीत आहे. तरीही अजून मदत मात्र मिळाली नाही. अन्यथा आम्हाला आंदोलनाला बसावे लागेल.
विष्णू हटवार, शेतकरी तथा भाजपा तालुका ग्रामीण महामंत्री, भंडारा