शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रीय महामार्गावर दहा तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:38 PM

राष्ट्रीय महामार्गावर बेला गावाजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर टँकरमधील आॅईल रस्त्यावर सांडल्याने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मुजबी ते वैनगंगा मोठा पुल अशी पाच किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला.

ठळक मुद्देबेलाजवळ टँकरचा अपघात : मुजबी ते वैनगंगा पुलापर्यंत वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा / जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गावर बेला गावाजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर टँकरमधील आॅईल रस्त्यावर सांडल्याने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मुजबी ते वैनगंगा मोठा पुल अशी पाच किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला.नागपुरहून भंडाराच्या दिशेने ट्रक क्रमांक एपी २१टीडब्लू ९३३९ शनिवारी पहाटे जात होता. बेला येथील सेंट पिटर शाळेसमोर ब्रेकरवर ट्रकची गती कमी झाली. त्याच वेळी मागाहून भरधाव आलेला टँकर क्रमांक डब्लूबी ३३डी३६४७ ने ट्रकला मागून धडक दिली. धडक एवढी भीषण होती की टँकरच्या केबीनचा अक्षरश: चुराडा झाला.त्यात टँकरचालक सोमनाथ रामजनमन राठोड (३४) हा जागीच ठार झाला. तर या अपघाताने टँकरची टाकी फुटली आणि आतील काळ्या रंगाचे आॅईल रस्त्यावर पसरले. रस्त्याच्या मधोमध अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्याच्या एका बाजूला काळ्या रंगाचे आॅईल वाहत होते. या आॅईलवरून जाणारे वाहने स्लीप होत होती.त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक एका बाजूने वळविण्यात आली. परिणामी वाहनाच्या पाच कि.मी. पर्यंत रांगा लागल्या. मुजबी गावापासून ते वैनगंगा पुलापर्यंत दुतर्फा शेकडो वाहने दुपारी २ वाजेपर्यंत अडकून पडली होती. वाहतूक पोलिसांच्या वाहतूक सुरळीत करताना नाकीनऊ आले होते.या वाहनांमध्ये शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात अडकले होते. त्यांना कार्यालयात जाण्यास विलंब झाला. दुपारी २ नंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी ट्रकचालक नंदकुमार बैस यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.भंडाऱ्यात गोंधळाची स्थितीभंडारा शहरात वैनगंगेच्या पुलापर्यंत वाहनांची मोठी रांग होती यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. एका बाजूला वाहने उभी असल्याने रस्ता ओलांडणे कठीण झाले होते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह महिलांना मोठी अडचण जात होती. जिल्हा परिषद चौकात वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रीत करीत होता. परंतु वाहनचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशीच अवस्था जिल्हा कचेरीसमोर बसस्थानकाकडे जाणाºया रस्त्यावरही झाली होती.