परजिल्ह्यात वाढली मागणी : वर्षभर १०० मजुरांना काम देण्याचा संकल्प, रेंगेपारच्या तरूण शेतकऱ्याची यशोगाथामोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील एका मॅट्रीक उत्तीर्ण युवकाने वर्षातून दहा महिने ९० मजुरांच्या हाताला शेतीत काम देऊन एक आदर्श प्रस्थापित केला आहे. गावात त्याला रोजगार हमी योजना असे नाव दिले असून येणाऱ्या पुढील काळात वर्षभरात १०० मजूरांना काम देण्याचा संकल्प केला आहे. या प्रगतीशिल शेतकऱ्याचे नाव सुभाष हिरबा निशाने (३९) रा. रेंगेपार असे आहे.सध्या सुभाष याने चार एकरात स्वत:च्या शेतीत भेंडीचे लागवड ३ डिसेंबर २०१५ ला केली होती. भेंडीचा प्रथम तोडा १० फेब्रुवारी २०१६ ला निघाला. प्रथम तोड्यात अडीच क्विंटल भेंडी निघाली. एक दिवसाआड १५ क्विंटल भेंडीचे उत्पादन निघत असून एका आठवड्यात ४५ क्विंटल भेंडी उत्पादन होते. सध्या भेंडीचा प्रति किलो २० ते २२ रुपये आहे.सहा पुरुष मजूर व ४१ महिला मजूर सुभाषकडे कामाला जातात. पुरुषाला प्रति दिवस २०० रुपये मजुरी तर महिलांना चार तासांचे ६० रुपये मजूरी दिली जाते. एका आठवड्यात ९० हजारांची भेंडी विक्री केली जाते. आतापर्यंत भेंडीचे २६ ते २७ तोडे झाले आहे. भेंडीचे पीक तीन महिने घेता येते. सुभाषने १,५७३ जे.के. जातीचे १४ किलो ग्रॅम भेंडीचे बियाणे ४५ हजार रुपयात खरेदी केले. एप्रिल महिन्यापर्यंत भेंडीचे उत्पादन घेतल्या जाणार आहे.एका आठवड्यातून दोनदा भेंडीला पाणी दयावे लागते. सुभाष ७० ते ८० हजार खतावर खर्च करावा लागला. भेंडी विक्री करिता गोंदिया येथील बाजारपेठेत नेली जाते. भेंडी रुचकर असल्याने गोंदिया बाजारपेठेत ही भेंडीला मोठी मागणी आहे.१० एप्रिलपर्यंत दुसरे काकडीची शेती ५ एकरात सुभाष लागवड करणार आहे. याकरिता ४० हजारांचा खर्च अपेक्षीत आहे. मे महिन्यापर्यंत काकडीचे उत्पादन घेता येणार आहे. यातून अडीच ते ३ लाखांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. वांगी, भेंडी व नंतर काकडी शेत पिकावर ४० मजूर तर ऊस लागवडीवर ५० मजूर असे ९० मजूर १० महिने सुभाषकडे कामे करतात.सुभाषकडे स्वत:ची १२ एकर शेती असून ३४ एकर शेती तो भाड्याने वर्षभर करतो. गावात रोजगार नाही. रोजगाराकरिता मजूर गाव सोडून पलायन करतात. गावातच १२ महिने रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता शासनावर अवलंबूनन राहता रोजगार उपलब्ध करुन देण्याचा संकल्प सुभाष याने केला आहे. शासन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वर्षातून ९० दिवस कामे उपलब्ध करुन देते, सुभाष त्याही पलीकडे जाऊन विचार करीत आहे.हेवा वाटावा असे काम शेती परवडत नसतांनी सुभाषने हाती घेतले व त्यात तो यशस्वी होत आहे. कृषी विभागाच्या आत्मा या संस्थेचा तो सदस्य आहे. पंरतु प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या बांधावर मात्र कृषी विभागाचे अधिकारी भेट देत नाही ही खरी शोकांतीका आहे. सुभाष यांची मजूरांप्रती तमळळ वाख्याण्यासारखी आहे, पंरतु भरघोष शेती उत्पादन घेण्याकरिता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर भेट देऊन आधूनिक पध्दतीने पीक कसे घेता येईल याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे.- हिरालाल नागपुरे, गटनेता, पंचायत समिती, तुमसर
चार एकरात घेतले दहा लाखांचे भेंडीचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2016 3:49 AM