पसार आराेपींची संख्या कमी करण्याची जबाबदारी पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्यावर देण्यात आली. त्यांनी जिल्हाभर शाेध माेहीम राबविली. जिल्ह्यात ९८ पसार आराेपी आहेत. त्यांचा शाेध घेण्यात आला. त्यावेळी दहा पसार आराेपींना अटक करण्यात आली. त्यात दाेन वर्षांपासून पसार असलेला माेहाडी तालुक्यातील कांद्री येथील अविनाश गणेश गजभिये याला अटक करण्यात आली. त्याला आंधळगाव पाेलिसांच्या हवाली करण्यात आले. दुसरीकडे एलसीबीच्या एका पथकाने सिरसघाट शिवारातील वैनगंगा नदी तिरावर हातभट्टी दारुवर धाड मारली. त्यावेळी आराेपी स्वप्नील कानेकर (३०) रा. अर्जुनी पुनर्वसन गिराेला याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १२० किलाे माेहसडवा जप्त करण्यात आला. कारधा पाेलीस ठाण्यात स्वप्नीलविरुध्द गुन्हा नाेंदविण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण, पाेलीस उपनिरीक्षक सुनील उईके, विवेक राऊत, सहायक उपनिरीक्षक मडामे, हवालदार शिवणकर, महाजन, बाेरकर, देशमुख, दाेनाेडे, पुराम, माळाेदे यांनी केली.