शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची भीषण समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:27 AM

२८ लोक ०१ के केंद्रात अनेक समस्या : कोरोना काळातही प्रशासनाचे दुर्लक्ष : रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड ...

२८ लोक ०१ के

केंद्रात अनेक समस्या : कोरोना काळातही प्रशासनाचे दुर्लक्ष :

रंजित चिंचखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

चुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा आटापिटा करत असताना त्यांनाच मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. चुल्हाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डझनभर समस्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या वाढल्याने कर्मचारी व रुग्णांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.

चुल्हाडात प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवनिर्मित इमारतीत स्थानांतरण करण्यात आले आहे. याठिकाणी मूलभूत समस्या असताना घाईगडबडीत प्रशासकीय कामकाज सुरु करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दबावाचा वापर केला. या इमारतीतील मुलभूत समस्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. या इमारतीत ऑपरेशन करण्यासाठी खोल्या असून, पाण्यासाठी टाकी उभारण्यात आली आहे. परंतु, या सिंटेक्सच्या टाकीत पाणीच नसते. याशिवाय ऑपरेशन खोल्याही रिकाम्या आहेत. याठिकाणी रुग्णांना साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांबाबतही असेच घडत आहे. त्यांच्या निवासाकरिता वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, या वसाहतीत पाणीच नाही. पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवारात विहीर असली, तरी नियोजनाअभावी पाण्याची समस्या सोडवता आलेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. परंतु, ही बोअरवेल बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. दरम्यान, या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक खोल्या उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. बाळंतपण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व अन्य ऑपरेशन करण्यासाठी या खोल्या आहेत. परंतु, सध्या या खोल्या रिकाम्या असून, याठिकाणी आवश्यक साहित्य देण्यात आलेले नाही.

कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी शासन काही मार्गदर्शक सूचना देत आहे. हात वारंवार धुवावेत, असे सांगण्यात येत आहे. परंतु, कर्मचारी व रुग्णांना हात धुण्यासाठी याठिकाणी पाणीच नाही. या आरोग्य केंद्राच्या आवारात बागबगीचा तयार करण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, या जागेत बगीचा तयार करण्यात आलेला नाही. आरोग्य केंद्रात पथदिवे लावण्यात आले आहेत. परंतु, रात्री बारा वाजल्यानंतर हे पथदिवे काम करत नाहीत. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा आटापिटा करत आहे. मात्र, याचवेळी त्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नाहीत. अलीकडे आमदार राजू कारेमोरे यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली होती. कोविड सेंटर सुरु करण्यासाठी ही भेट होती. यावेळी पाण्याच्या समस्येचे गाऱ्हाणे मांडताच नंतर ते फिरकलेच नाहीत. कोरोना संसर्गाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेत आरोग्य यंत्रणा ‘हायटेक’ करण्यात येत नाही. चुल्हाड येथील आरोग्य केंद्र नावापुरतेच असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

बॉक्स

ओपीडीत रुग्णांची घसरण

आठवडाभरापासून ओपीडीत रुग्णांची घसरण सुरु झाली आहे. दिवसभरात २० ते २५ रुग्णच ओपीडीत उपचारासाठी येत आहेत. व्हॅक्सिनबाबतही नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन नसल्याने व्हॅक्सिनकरिता नागरिक पुढाकार घेत नाहीत. ग्रामपंचायत स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येत असताना व्हॅक्सिन घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. नागरिकांचे तुलनेत लसीचा आकडा आखडता असल्याने उद्दिष्ट्य गाठताना चिंता वाढत आहेत. आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन व्हॅक्सिनबाबत जनजागृती करत असतानाही गावकरी जागृत होत नसल्याचे चित्र आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. पाणीच नसल्याने कर्मचारी व रुग्ण त्रस्त झाले आहेत. पाण्याविना अनेक कामे प्रभावित होत असल्याने वारंवार वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले पाहिजे.

- डॉ. संजीव नैतामे, वैद्यकीय अधिकारी, चुल्हाड

कोट बॉक्स

चुल्हाडच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात मुलभूत समस्या असताना त्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. उद्घाटन प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी आरोग्य विभागाने घाईगडबडीत स्थानांतरण केले आहे. केंद्रात असणाऱ्या समस्यांवरून आता सगळेच बोंबलत आहेत. कोरोना संकट असताना प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने दुर्दैवच म्हणावे लागेल.

- किशोर रांहगडाले, बिनाखी