लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि आता तिसऱ्या लाटेत एकूण ६५ हजार ६९० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहेत. ५ लाख २९ हजार ३८१ व्यक्तींची चाचणी केल्यावर उपरोक्त व्यक्ती बाधित आढळले होते. यापैकी ६२ हजार १४७ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत २ हजार ४०५ व्यक्ती बाधित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ११३८ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर ०१.७३ इतका आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १७ हजार ६०० जणांची आरटीपीसीआर चाचणी, तर ४ लाख ११ हजार ४९५ व्यक्तींची अँटिजन तपासणी करण्यात आली आहे, तर २८६ जणांची ट्रूनॅट तपासणी करण्यात आली आहे.
३६ व्यक्ती रुग्णालयात दाखल
जिल्ह्यात सद्य:स्थितीत २ हजार ४०५ व्यक्ती सक्रिय रुग्ण म्हणून उपचार घेत आहेत. यापैकी फक्त ३६ व्यक्ती रुग्णालयात दाखल आहेत. यात खासगी आयसोलेशनमध्ये १५, शासकीय रुग्णालयात १५, तर सहा व्यक्ती ऑक्सिजन आयसोलेशनमध्ये भरती आहेत. भंडारा तालुक्यात सर्वांत जास्त रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत, तर सर्वांत कमी रुग्ण लाखांदूर तालुक्यात आहेत.