लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : ठाणा पेट्रोलपंप येथील नवीन पाणीपुरवठा योजनेवर ९६ टक्के रक्कम खर्च होऊनही १० वर्षापासून गावकऱ्यांना एक थेंब पाण्याचा मिळाला नाही. याप्रकरणी विविध स्तरावर चौकशी केली. पदरात अपयश पडले. परिणामी ग्रामस्थांच्या अर्जानुसार विशेष ग्राम सभा बोलावून प्रशासन व अमंलबजावणी करणाऱ्या यंत्रणाविरुध्द जनहित यांची न्यायालयात दाखल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.भारत निर्माण योजनेंतर्गत एक कोटी ४६ लक्ष किंमतीची नवीन ठाणा पाणीपुरवठाची महत्वाकांक्षी योजना मंजूर झाली. त्यानुसार सन २००१ च्या जनगणनेच्या आधारावर चार हजार लोकसंख्या नुसार गावात विस्तारित वितरण समस्येनुसार पाणीपुरवठा पाईप लाईन टाकण्यात आली. त्यानुसार गावनकाशा अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. हे काम दिड वर्षात पुर्ण अपेक्षीत होते. तीन कंत्राटदारानी गावातील पाणीपुरवठ्याचे कामे केली.मात्र गावाला एक थेंब पाणी मिळाले नाही. १० वर्षा दरम्यान ग्रामसभेत पाणी प्रश्नाबाबद गावकरी चर्चा घडवून आणीत होते. मात्र उडवा-उडवीचे उत्तरे मिळत होते. ग्रामपाणीपुरवठा समिती, ग्रामपंचायत व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद एकमेकांवर दोषारोपण करीत होते. यात गावातील जनता पाण्यासाठी भरकटली जात होती. सामाजिक कार्यकर्ता अमित देशकर यांनी गावाअंतर्गत वितरण पाईप लाईनला नकाशाची मागणी माहितीच्या अधिकारांतर्गत मागितली होती. मात्र पाणीपुरवठा विभागाकडे योजनेची फाईलच नाही वा ग्रामपचांयत ठाणा मध्ये गावाचा वितरण पाईप लाईनचा नकाशाच नव्हता. प्रकरण राज्य माहिती अधिकारी कक्षाच्या दालनात नाना कारणामुळे प्रलंबित आहे. यावरुन कुठेतरी खेळ झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार शंका व्यक्त करण्यात येत आहे. विशेष ग्रामसभा ११ फेब्रुवारी रोजी झाली. सरपंच सुषमा पवार अध्यक्षस्थानी होते. यात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडाराचे कार्यकारी अभियंता मोरेश्वर मैदमवार, उपविभागीय अभियंता प्रदिप सावरकर, वर्ग २ चे शाखा अभियंता हितेश खोब्रागडे उपस्थित होते. ग्रामसभेत पाणीपुवठ्याचा मुद्दा वादळी ठरला.सन २००७ पासुन सुरु झालेली ठाणा पाणीपुरवठा योजनेतील सन २०१२ पर्यंत सुमारे ९६ टक्के रक्कम खर्च झाले. या कामात दोष निर्माण झाले. स्थानिक पाणीपुरवठा समिती व कंत्राटदारामध्ये सकारात्मक निर्णयाचा अभावामुळे योजनेत त्रुट्या आहेत. यासंबध्ांी ठाणा योजनेची फाईल आम्हच्या कार्यालयात नाही. टाकलेले पीव्हीसी पाईप लाईनमध्ये दोष आहेत. ठिकठिकाणी लिकेज आहेत. होणाºया चौकशीला सामोरे जाण्याची तयार आम्हची आहे.-मोरेश्वर मैदमवार, कार्यकारी अभियंता,जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.
ठाणा येथील पाणीप्रश्न पोहचणार न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:14 PM
ठाणा पेट्रोलपंप येथील नवीन पाणीपुरवठा योजनेवर ९६ टक्के रक्कम खर्च होऊनही १० वर्षापासून गावकऱ्यांना एक थेंब पाण्याचा मिळाला नाही. याप्रकरणी विविध स्तरावर चौकशी केली. पदरात अपयश पडले.
ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेचे प्रकरण : ग्रामसभेत जनहित याचिका मंजूर