लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : शासकीय तथा निमशासकीय कामात सिहोरा परिसरात विना रॉयल्टीच्या मुरुमाचा सर्रास वापर होत आहे. शेतशिवार खोलीकरणाच्या नावावर रॉयल्टी काढली जात नाही. या मुरुमाची विल्हेवाट पाणंद रस्ते, डांबरीकरण रस्त्याच्या कामात लावली जात आहे. यात लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तलाठी कार्यालयाचे लक्ष मात्र नाही.
सिहोरा परिसरात असणाऱ्या चुल्हाड, रनेरा, धनेगाव, गावाचे शिवारात अव्वल दर्जाच्या मुरुमाच्या खदाण आहेत. या गावांच्या शिवारातून मुरूम चोरीला जात असल्याने खदाण पडलेल्या आहेत. मुरुमाचे उत्खनन केल्यानंतर खदाण खुल्या सोडल्या जात आहेत.
चोरी प्रकरणात एकही ट्रॅक्टरवर कारवाई नाहीचुल्हाड गावशिवारात जिकडे तिकडे जीवघेण्या खदाण तयार आहेत. तलाठ्याकडून मुरूम चोरी प्रकरणात एकही ट्रॅक्टरवर कधी कारवाई झाली नाही. राजरोसपणे मुरुमाची वाहतूक होत असताना सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. शासकीय गट पोखरून काढण्यात आले आहेत.
चोरीचे प्रकार वाढलेशासकीय आणि घरांच्या बांधकामात मुरुमाची गरज लागत असल्याने हे चोरीचे प्रकार वाढले आहेत. शासकीय कामात मुरुमाचा उपयोग लागत असताना रॉयल्टी काढली जात नाही.
कंत्राटदारांचे शेतकऱ्यासोबत साटेलोटेमातोश्री पाणंद रस्ते, खडीकरण रस्त्याचा यात समावेश आहे. हे रस्ते मुरूम घातल्याशिवाय होत नाहीत. रस्त्यांना मुरुमाची गरज असताना रॉयल्टीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला जात नाही.बहुतांश गावांत मुरुमाचे गट निर्धारित करण्यात आले आहेत. परंतु या गावात जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. शेतशिवारातून मुरूम खोदकाम करताना रॉयल्टी काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंत्राटदार मात्र छुप्या मार्गाने मुरूम उपलब्ध करीत आहेत.
कंत्राटदारांचे शेतकऱ्यासोबत साटेलोटेशासकीय कामात कंत्राटदारांना मुरुमाची गरज लागत असताना शेतकऱ्यासोबत साटेलोटे करण्यात येत आहे. मुरूम खरेदी केले जात आहे. पैसे मोजले जात आहेत. याशिवाय शेतीचे समतल करण्याचे आमिष दाखविले जात आहेत. शेतीचे खोलीकरण होत असल्याने शेतकरीही मुरूम खोदकामास मंजुरी देत आहेत.