लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या भंडारा-रामटेक महामार्गाचे खांबतलाव चाैकात काम तीन वर्षांपासून ठप्प आहे. अत्यंत वर्दळीच्या या चाैकात माेठमाेठाले खड्डे पडले असून दरराेज लहान माेठे अपघात हाेत आहेत. सहा महिन्यांत चाैघांचा या खड्ड्यांनी बळी घेतला. जणू खांबतलाव चाैक वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे.भंडारा ते रामटेक राष्ट्रीय महामार्ग घाेषित झाल्यानंतर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. जिल्हा परिषद चाैक ते बीएसएनएल कार्यालय आणि रेल्वे क्राॅसिंग ते खात राेड अशा रस्ता तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र, शीतलामाता मंदिर परिसरात खांबतलाव चाैकात या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर माेठमाेठाले खड्डे पडले आहेत. जीवघेण्या खड्ड्यातून खात राेड आणि वरठी राेडकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करावा लागताे. विशेष म्हणजे तुमसरकडे जाणारी संपूर्ण अवजड वाहतूक याच चाैकातून जाते. त्याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची माेठी काेंडी हाेते. खड्यांमुळे अपघात हाेत आहेत. गत सहा महिन्यांत येथे अनेक अपघात झाले आहेत. चाैघांचा बळी गेला आहे.नागरिक व सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला की राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करतात. मात्र, काही दिवसांतच पुन्हा रस्त्यावर खड्डे कायम दिसतात. आता पुन्हा या खड्ड्यांमुळे शहरातील वातावरण तापत असून विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्षभंडारा शहरातील खांब तलाव चाैकातून जिल्ह्यातील बहुतांश लाेकप्रतिनिधींच्या घराकडे जाणारे रस्ते आहेत. खासदार, आमदार, माजी आमदार यासह विविध पक्षांचे पदाधिकारी याच परिसरात राहतात. तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची घरेही आहेत. दिवसातून किमान एकदा ही मंडळी या रस्त्यावरून जातात. मात्र रस्त्याकडे त्यांचे दुर्लक्ष हाेत आहे.
शिवसेनेचा आठ दिवसांचा अल्टीमेटम- तीन वर्षांपासून रखडलेल्या खांब तलावातील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. गुरुवारी शिवसेना शहरप्रमुख मनाेज साकुरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे शहर संघटक नितीन धकाते, युवा सेना संघटक मुकेश थाेटे, टिंकू खान, कृष्णा ठवकर, प्रकाश देशकर यांनी हा अल्टीमेटम दिला आहे.
जय जवान संघटनेचे बेमुदत धरणे- तीन वर्षांपासून अपूर्ण असलेल्या खांबतलाव चाैकातील रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी जय जवान, जय किसान संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून खांबतलाव चाैकातच धरणे आंदाेलन सुरू केले आहे. यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. या रस्त्याचे बांधकाम तत्काळ पूर्ण झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदाेलन करण्याचा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन घनमारे यांनी दिला. शुक्रवारी धरणे आंदाेलनात संजय मते, अरुण भेदे, बाबा पाटेकर, राजकपूर राऊत, सचिन बागडे, सुहास बागडे, सुहास गजभिये, जगदिश कडव, पराग खाेब्रागडे, सुगद शेंडे, निश्चल येनाेरकर, भारती निमजे, नंदकिशाेर नागाेसे, कमलेश बाहे, पायल सतदेवे, लक्ष्मण वानखेडे, मनिष साेनकुसरे, राकेश आगरे, पवन भेले, कमलेश मेंढे, प्रशांत सराेजकर, बबन बुध्दे, सचिन हुमणे, लक्ष्मण कनाेजीया, किशाेर पंचभाई यांच्यासह अनेकजण सहभागी झाले हाेते.