भंडारा : व्यापारात साेबत घेतलेल्या चुलत भावानेच नागपूरच्या व्यापाऱ्याचा गळा चिरून खून केल्याचे पाेलीस तपासात उघड झाले. पाेलिसांनी अवघ्या १२ तासात आराेपीला जेरबंद केले. पवनी तालुक्यातील लेंडेझरी जंगलातील नेरला ते इटगाव मार्गावर गुरुवारी दुपारी २ वाजता धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्याची घटना घडली हाेती.
संदेश राजेंद्र क्षीरसागर (२४) रा. साईकृष्णा रेसिडेन्सी, पिपला हुडकेश्वर, नागपूर असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. अनिकेश पंजाबराव क्षीरसागर (४९) रा. उदयनगर नागपूर असे मृताचे नाव आहे. लेंडेझरी जंगलात गळा चिरलेल्या अवस्थेत गुरुवारी मृतदेह आढळला हाेता. या घटनेची माहिती मिळताच पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पाेलीस अधिकारी रिना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण, अड्याळचे ठाणेदार सुधीर बाेरकुटे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून मृतदेह नागपूर येथील अनिकेश क्षीरसागर यांचा असल्याचे पुढे आले. काैशल्याचा वापर करून तपास सुरू झाला. अड्याळ येथील एका दुकानात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून अनिकेशचा चुलतभाऊ संदेश क्षीरसागर याच्याशी संपर्क साधला. तेव्हा ताे एकटाच ब्रम्हपुरी येथे असल्याचे सांगितले. मात्र त्याच्या संभाषणात फरक जाणवत असल्याने लक्षात आले. त्यावरून पाेलिसांनी त्याला नागपूर येथून ताब्यात घेतले. सुरुवातीला ताे उडवाउडवीचे उत्तर देत हाेता. मात्र पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने चुलत भावाचा खून केल्याचे सांगितल
व्यवसायातील अपहार ठरले खुनाचे कारण
आराेपी संदेश आणि अनिकेश हे सख्खे चुलत भाऊ आहे. संदेश हा पूर्वीपासून वाईट संगतीत हाेता. त्याला सुधरावे म्हणून अनिकेशने त्याला आपल्या व्यापाऱ्यात साेबत घेतले. मात्र गुंड प्रवृत्तीचा संदेशच्या वागणुकीत कोणातच फरक पडला नाही. उलट त्याने आपल्या भावाच्या व्यापाऱ्यातच अपहार केला. काेराेनाे काळात त्याने पैशांची अफरातफर केल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली हाेती. याच घटनेचा वचपा काढण्यासाठी खून केल्याचे पुढे आले.
जंगलात जेवणाची आवड बेतली जीवावर
अनिकेश याला जंगलात जेवणाची आवड हाेती. त्यामुळे कुठेही बाहेरगावी जायचे असल्यास ताे साेबत डब्बा घायचा. जंगलात चांगली जागा पाहून त्या ठिकाणी जेवण करायचा. गुरुवारी ही ताे आपला चुलत भाऊ संदेश सोबत कारने डब्बा घेऊन निघाले हाेते. इटगाव जंगलात रस्त्यावर कार उभी करून अनिकेश व संदेश दाेघेही जेवायला बसले. डब्यातील तेलाचे डाग पुसण्यासाठी झाडाची पाने आणताे असे सांगून संदेश थाेडा दूर गेला. काही वेळात त्याने आपल्या बॅगमधील शस्त्र काढून अनिकेशचा गळा चिरला. जंगलात जेवणाची आवड अनिकेशच्या जीवावर बेतली.