लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साकोली येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राचार्याने सायंकाळी बागेत आलेल्या १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यावर संतप्त जमावाने त्याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी या प्राचार्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित संस्थेनेही त्याला सेवेतून बडतर्फ केले.
पोलीस सूत्राने मिळालेल्या माहितीनुसार, पी.एस. रघु असे या प्राचार्याचे नाव आहे. मुळचा तामिळनाडू येथील असून पंचशील वार्डातील एका घरी भाड्याने राहतो. मागील चार-पाच वर्षापासून साकोली येथील एका नामांकित औषधशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहे. घटनेच्या रात्री गुरूवारी ९:३० वाजताच्या सुमारास आरोपी लुंगी व बनियनवर नागझिरा रोडवरील नगरपरिषदेच्या बागेत बसला होता. तिथे एक दिवसापूर्वीच राहायला आलेल्या एका कुटुंबातील तेरा वर्षीय मुलगी खेळण्यासाठी आली असता,त्याने मुलाला जवळ बोलावून अश्लील चाळे सुरू केले. यामुळे मुलगी घाबरून ओरडली आणि बाजूलाच असलेल्या घरी धावत गेली. तिने प्रकार घरी सांगितल्यावर आई व भावाने बागेत येऊन चिचारणा केलई, बागेत असलेल्या युवकांच्या व नागिरकांच्या लक्षात हा प्रकार येताच जमावाने त्याला प्रचंड मारहाण केली. मारहाणीत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. रात्री सुमारे दोन वाजताच्या दरम्यान साकोली पोलीस स्टेशन येथे प्राचार्य रघु विरूद्ध लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली कलम ३५४, अ २ भादंवि पोक्सो नुसार गुन्हा नोंदविला. संस्थेने तातडीने त्याला बडतर्फ करण्याची कारवाई केली.