भंडारा : रमाई घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यातील २११० घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर करण्यासाठी जानेवारी महिन्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पत्र पाठवून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सर्व बीडीओंना दिले. तसे प्रस्तावही सादर करण्यात आले. मात्र आचारसंहितेमुळे पालकमंत्र्यांची स्वाक्षरी झाली नसल्याने ही प्रक्रीया रेंगाळली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाकडून विविध घरकुल योजना राबविल्या जात आहेत. यापैकी एक रमाई घरकुल योजना. सन २००२३ -२४ अंतर्गत २११० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यानुसार पंचायत समिती कार्यालयाच्या आवास विभागाच्या वतीने संबंधित योजनेच्या घरकुलाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार सातही तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्जातील उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पीटीआर आदी कागदपत्रांची तपासणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आले.
१० जानेवारी रोजी २११० लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळणार होती. मात्र पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीअभावी ही प्रक्रीया रेंगाळली आहे. त्यांच्या स्वाक्षरी झाल्यास मान्यता मिळणार आहे. मान्यतेनंतर अनुदानाचा पहिला हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. मात्र अद्यापही या लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता वर्ग करण्यात आला नसल्याची स्थिती आहे. परिणामी संबंधित लाभार्थ्यांना अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.मोफत वाळू वाटप करावीरमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना आदी योजनेतील लाभार्थ्यांसाठी अडचणी येत असल्याने अनेकांना मोफत वाळू मिळाली नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी जिल्ह्यातील वाळूघाटावरुन पाच ब्रास वाळू मोफत वाटप करण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.चार जून प्रक्रीया सुरु होणारलोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता आहे. त्यामुळे चार जूननंतर आचारसंहिता संपली की घरकुल योजना अंतर्गत रखडलेल्या पहिला हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.तालुकानिहाय असे आहेत उद्दीष्टतालुका मातंग समाज अनुसूचित जाती नवबौध्द एकूणभंडारा ३३ १०० १३३मोहाडी १८ १०० ११८तुमसर १० १०० ११०साकोली १६ ८५० ८६६लाखनी १४ ५० ६४पवनी १२ ३५० ३६२लाखांदूर ७ ४५० ४५७एकुण ११० २००० २११०