लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवळपास दीड वर्षांपूर्वी ६० लाख रुपये खर्च करून डांबरीकरणाचा रस्ता तयार झाला. मात्र मुसळधार पावसाने या रस्त्याचे हाल केले. होय ही व्यथा आहे भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय ते ग्रामसेवक कॉलनीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याची.
सद्यस्थितीला भंडारा शहरात रस्त्याच्या नूतनीकरण कामाचा सपाटा लावला आहे. सिमेंटच्या रस्त्यावर पुन्हा सिमेंटचे रस्ते बांधले जात आहे. त्यात डांबरीकरणाचाही कुठे कुठे समावेश आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालय ते ग्रामसेवक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र अल्प कालावधीतच यावरील डांबर उखळायला लागले. उरलेली कसर मुसळधार पावसाने भरून काढली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जीव घेणे आता खड्डे पडले आहेत. येथूनच मोठ्या प्रमाणात बाजाराला लोक येतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ६० लाखांचा चुराडा केल्यावरही कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणा मूग गिळून आहे. बांधकाम विभागानेही डोळे बंद केले की काय असे दिसून येत आहे.
वर्षभरात रस्ता खराब६० लाख रुपये खर्च करून रस्ता बांधकामाची गुणवत्ता काय राहिली हे रस्त्याचे बोलके दृश्य पाहूनच दिसून येत आहे. यावर कुणीही बोलत नाही.
६० लाखांचे कामजिल्हा सामान्य रुग्णालय ते ग्रामसेवक कॉलनीकडे जाणाऱ्या या जवळपास ३०० मीटर रस्त्याच्या बांधकामासाठी जवळपास ६० लाखांचा चुराडा करण्यात आला. अल्पवधीतच या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाले आहे.
पुढे काय?लाखो रुपये खर्च करून डांबरीकरणाचा रस्ता बांधला गेला. नागरिकांनी ओरड केली परंतु त्यावर स्थानिक प्रशासन व कंत्राटदार बोलायला तयार नाहीत. बांधकामाची गुणवत्ता काय होती, हे यावरून दिसत असले तरी आता प्रशासन काय कारवाई करणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोणी केले काम?नगरपालिकेच्या वतीने एका खासगी कंत्राटदाराला या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते. तिथे आजही फलक लागले आहे