शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार
2
प्रेरणादायी! 'मोटरस्पोर्ट्स'साठी टेनिसपटूचं 'धाडस', तरूणाईसाठी उभारलं हक्काचं व्यासपीठ
3
विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी?
4
चक्रीवादळ: बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात कधी येणार? मोठी अपडेट आली...
5
"मी शिवसैनिक, बोललो ते बोललो..."; आईवरून शिवीगाळ केल्याचं अंबादास दानवेंकडून समर्थन
6
India Vs Zimbabwe T20i Series 2024: टीम इंडिया नव्या परीक्षेसाठी झिम्बाब्वेला रवाना! शुबमन गिल संघाचा कॅप्टन, द्रविडच्या जागी कोण?
7
जनरल मोटर्स, फोर्ड आता फोक्सवॅगन! जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात अपयशी ठरली 
8
"आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील...", विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!
9
Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक
10
Priyanka Gandhi : "BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं..."; प्रियंका गांधी कडाडल्या
11
धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी
12
बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण
13
"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे
14
"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन
15
राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी
16
थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले...
17
उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?
18
'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा
19
"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी
20
Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

दोघांचे जीव घेणारा पवनीतील वाघ अखेर झाला बंदिस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 3:16 PM

गावकरी संतप्त : एकाच आठवड्यात दोघांचा बळी, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता

पवनी (भंडारा) : एकाच आठवड्यात दोन गावकऱ्यांवर हल्ला करून बळी घेणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे संतापलेले गावकरी बुधवारी रस्त्यावर उतरले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. अखेर सायंकाळी उशिरा वाघाला बेशुद्ध करून पकडल्यावर हा तणाव निवळला आहे. असे असले तरी वाघाची दहशत मात्र गावकऱ्यांमध्ये कायमच आहे.

मागील आठवड्यात घडलेल्या घटनेमध्ये पवनी तालुक्यातील गुडेगाव येथील राखीव वनक्षेत्र क्रमांक २३८ जवळ असलेल्या छगन सावरबांधे यांच्या शेताजवळ बकऱ्या चारायला गेलेल्या सुधाकर सीताराम कांबळे (४२ वर्षे) या व्यक्तीचा दुपारी वाघाच्या हल्लात मृत्यू झाला होता. शेताच्या धुऱ्यावर नाल्यालगत बकऱ्या चारणाऱ्या सुधाकरवर वाघाने मागून हल्ला करून फरफटत नेले होते. नंतर त्याचा मृतदेह जंगलात दिसला होता. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वाघाला पकडण्याची मागणी करून आंदोलन केले होते. मात्र निव्वळ आश्वासन देऊन वन विभागाने वेळ मारून नेली.

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार, गावकऱ्यांच्या हल्ल्यात वन अधिकारी जखमी

या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा सात दिवसातच या घटनेची पुनरावृत्ती झाली. खातखेडा गावातील ईश्वर सोमा मोटघरे (५८) या शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर वाघाने अर्धवट खाल्लेले प्रेत दिसले.

दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य

पवनी तालुक्यात एकाच आठवड्याच्या अंतराने घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य आहे. घटनेनंतर गावकरी संतप्त झाले होते. आंदोलनाचा इशारा देऊनही दखल न घेतल्याने बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याचा प्रसंग उद्भवला. वेळीच दखल घेतली असती, तर जीव वाचला असता, गावकऱ्यांचा क्षोभही टाळता आला असता.

उपवनसंरक्षक गवई यांचे लेखी आश्वासन

तणावाच्या घटनेनंतर उपवन संरक्षक गवई यांनी गावात पोहोचून गावकऱ्यांशी चर्चा केली. सुरक्षेचे आश्वासन दिले. लगतच्या जंगलातील झुडपे मजुरांचे साहाय्याने पंधरा दिवसात काढण्यात येतील. वाघ जेरबंद होत नाही तोपर्यंत वनविभागाचे कर्मचारी गावाचे परिसरात गस्त करतील. मृताच्या कुटुंबीयांना देय असलेले संपूर्ण लाभ एक महिन्यात देण्यात येतील. तसेच, गावालगत असलेल्या तलावाला जाळीचे कुंपण करण्याचा प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजना किंवा राज्य योजनेतून पंधरा दिवसांत अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

मृताच्या कुटुंबीयांना मदत

मृत ईश्वर मोटघरे यांच्या कुटुंबीयांना वन विभागाने तातडीची मदत केली. तीस हजार रुपये नगदी व नऊ लाख सत्तर हजार रुपयांचा धनादेश कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

टॅग्स :Tigerवाघbhandara-acभंडारा