पोलीस सूत्रानुसार, घटनेतील पीडित शेतकऱ्याला २०१९ मध्ये शासकीय योजनेअंतर्गत ओसवाल कंपनीचे सोलर सबमर्सिबल मोटारपंप संचाची सामग्री उपलब्ध करण्यात आली होती. त्यानुसार घटनेतील शेतकऱ्याने गुंजेपार शेतशिवारातील चूलबंध नदीपात्रात मोटारपंप लावून शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करीत असे. तथापि, गत ५ सप्टेंबरला घटनेतील शेतकऱ्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांकरवी मोटारपंपाअंतर्गत सिंचन करण्यात आले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास काही अज्ञात आरोपींनी नदीपात्रात लावलेल्या सोलर सबमर्सिबल मोटर पंप किमती ७० हजार रुपये व २ कोअर केबल किमती पाच हजार रुपये, असे एकूण मिळून ७५ हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली. तथापि, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील पीडित शेतकऱ्याचे काही सदस्य शेतात मोटारपंप सुरू करावयास गेले असता मोटारपंप चोरी गेल्याची घटना उघडकीस आले. या घटनेतील पीडित शेतकरी व अन्य सदस्यांनी लाखांदूर पोलीस ठाणे गाठीत अज्ञात आरोपींविरोधात चोरीच्या गुन्ह्याची तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
दरम्यान, मागील काही वर्षांत शासकीय योजने अंतर्गत तालुक्यातील विविध शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आलेल्या सोलर मोटारपंप चोरीची ही तिसरी घटना असल्याने हे मोटारपंप चोरट्यांचा शोध लावण्याचे कडवे आव्हान लाखांदूर पोलिसांपुढे आहे. अधिक तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक राजेश शेंडे करीत आहेत.