विलास बंसोड ।लोकमत न्यूज नेटवर्कउसर्रा : पोटाची खळगी भागविण्यासाठी या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत पायदळ भटकंती करणारे, घरात अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेले अंधारमय जीवन जगणारा गोपाळ समाज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आजही त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे.ज्ञानेश्वर मोहन यादव रा.लंजेरा यांच्यासमवेत सहा कुटुंब मागील २० वर्षापासून बाहेर ठिकाणावरून भटकंती करत लंजेरा येथे वास्तव्यास आहेत. स्वत:च्या मालकीची जागा नाही. सध्या शासकीय जागेवर गवताची झोपडी बांधून हे सहाही कुटुंब त्या झोपड्यात संसार करीत आहे. झाडू बनविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावोगावी जाऊन लोकांचे मनोरंजनात्मक खेळ करायचे पण सध्या तरी फळे बनून गावात फळे विकण्याचे काम करतात.हातावर हाणणे व पानावर खाणे हा यांचा नित्यक्रम घरात दोन मुले सांभाळण्यास व संसाराचा रहाटगाडगा चालवण्यास मात्र त्यांची दमछाक होते.आतापर्यंत राहण्यासाठी जमिनीचे पट्टे मिळाले नाही. गवताच्या झोपडीत राहतात पण वादळ पावसाने या झोपडी उडून जातात.अशा या भटक्या समाजाला जातीचा दाखला नाही ही एक शोकांतिका म्हणावे लागेल. शासनाकडून घरकुल योजना राबविते पण अशा निरागस कुटुंबाकडे त्यांच्या सोयी सवलतीकडे कोण लक्ष देणार? त्यांचा आर्थिक, सामाजिक न्यायासाठी पुढे कोण सरसावणार? हा येणारा काळच सांगेल पण सध्यातरी त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
‘त्यांच्या’ वाट्याला आले उपेक्षितांचे जीणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 9:57 PM
पोटाची खळगी भागविण्यासाठी या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत पायदळ भटकंती करणारे, घरात अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेले अंधारमय जीवन जगणारा गोपाळ समाज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आजही त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे.
ठळक मुद्देव्यथा गोपाळ समाजाची : सोईसुविधांपासून नागरिक वंचित