शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

-तर चौधरींना राजीनामा मागू

By admin | Published: July 11, 2016 12:29 AM

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले रामलाल चौधरी हे काँग्रेस पक्षाचे आहेत.

सेवक वाघाये : जिल्हा दूध संघाची निवडणूकभंडारा : जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले रामलाल चौधरी हे काँग्रेस पक्षाचे आहेत. दबावात येवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी पत्रपरिषदेत केला.जिल्हा दूध संघाची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संयुक्तरित्या लढविली होती. चौधरी हे काँग्रेसमध्ये असतानाच दूध संघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केला होता. काँग्रेस पक्षातून निवडून आल्यानंतर पक्षाची ताकत वाढत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला. चौधरी हे बाजार समितीचे सभापती आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीत अनेकांचा विरोध असताना आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली. गावातही काँग्रेस पदाधिकारी म्हणून ते वावरतात. दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार अध्यक्ष बनत असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेचे सभापती विनायक बुरडे यांचे नामांकन अर्ज दाखल केले नाही. अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश हा जनतेची दिशाभूल करणारा आहे. एका पक्षात निवडून यायचे आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा. अशा लोकांना जनता माफ करत नाही, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, माजी नगराध्यक्ष बशिर पटेल उपस्थित होते. या संदर्भात दूध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. (जिल्हा प्रतिनिधी)