मेस्टाचा इशारा : शाळांना व्यावसायिक दरातून सवलत द्याभंडारा : राज्यातील इंग्रजी शाळा संस्था संचालक संघटना इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधत आहे. यासंदर्भात समस्या सरकारला अवगत करुन दिल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या समस्या न सोडविल्यास हिवाळी अधिवेशनात विदर्भातील १० हजार संस्था संचालक मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे देण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन ‘मेस्टा’ने केला आहे.भंडारा येथे आयोजित पत्रपरिपदेत बोलताना मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष संजय तायडे पाटील म्हणाले, १० हजार संस्था संचालकांच्या धरणे देण्यामुळे सरकार समस्या सोडविणार नसेल तर राज्यातील ४० हजार संस्था संचालक एकत्र येऊन मुंबईत धरणे देतील. राज्य शासनाने दखल न घेतल्यास आम्हाला शाळा बंद कराव्या लागतील. त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर व मध्यम वर्गियांच्या पाल्यांना कमी खर्चात मिळणाऱ्या इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहावे लागेल असे सांगून ते म्हणाले, पीटीए स्थाप असताना शुल्क विनियमन कायदा शिथिल करण्यात यावा, शुल्क बुडविणाऱ्या पाल्यांचे प्रवेश दुसऱ्या शैक्षणिक वर्षात रद्द करण्याचा अधिकार देण्यात यावा, शाळांसाठी संरक्षण कायदा करावा, शाळा इमारतीला व्यावसायिक दराने वीज बील व शाळांवर लादण्यात आलेले कर रद्द करण्यात यावे अशा मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला प्रदेश सचिव राजेंद्र दायमा, महिला प्रदेशाध्यक्ष जागृती धर्माधिकारी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.गजानन नारे, विदर्भ अध्यक्ष संजय कोचे, विभागीय सरचिटणीस आशिष पालीवाल, भंडारा जिल्हाध्यक्ष सुनिल मेंढे, नागपूर जिल्हाध्यक्ष नाना सातपुते, तथागत मेश्राम उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
-तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे देऊ
By admin | Published: September 11, 2015 12:55 AM