रंजित चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात एजन्सी धारकांनी सुरक्षारक्षक नियुक्तीत मनमानी कारभार करीत कपात केले आहे. फक्त चार सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहे. सुपरवायझर गुलाब पटले एजन्सी धारकांचे कामावर कार्यरत आहेत. वेतन मात्र प्रकल्प स्थळात सुरक्षारक्षकाचे घेत आहेत. प्रकल्पात होत असलेल्या अनियमिततेला पाटबंधारे विभागाची यंत्रणा जबाबदार आहे. शासकीय निधीचे वारे न्यारे करण्यात येत असताना विभागीय स्तरावर चौकशीची मागणी होत आहे.
बावणथडी नदीवर तयार करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात निविदा अंतर्गत कामे केली जात आहेत. पंपगृह, सुरक्षारक्षक, विधूत विभाग अशा निविदा काढल्या जात आहेत. टाकीतील गाळ उपसा निविदा अंतर्गत करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. सुरक्षारक्षकाचे टेंडर निविदा अंतर्गत कुरेशी नामक कंत्राटदाराला देण्यात आले आहे. प्रकल्प स्थळात नऊ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे करारबद्ध आहे. एक सुपरवायझर अशा नियुक्त्या आहेत. परंतु एजन्सी धारक कंत्राटदाराने फक्त चार सुरक्षारक्षक नियुक्त केले आहे. दिवस रात्र प्रत्येकी दाेन असे सुरक्षारक्षक १२ तास सेवा देत आहे. उर्वरित पाच सुरक्षा रक्षकाचे अनुदान हडपण्यात येत आहे. महिन्याकाठी २५ हजार रुपयांचे अनुदान हडपले जात आहे. सुरक्षारक्षकावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुपरवायझर पदावर गुलाब पटले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षारक्षक नियुक्ती, सुपरवायझर कागदोपत्री असताना मात्र यंत्रणा मूग गिळून आहे. सुरक्षारक्षकाचे पूर्ण जागा भरण्यात आले नाहीत. प्रत्यक्षात चार सुरक्षारक्षक कार्यरत असल्याचे दिसून येत असताना एजन्सी धारकांवर कारवाई केली जात नाही.
मध्यंतरी प्रकल्प स्थळात सुरक्षारक्षक नियुक्त असताना पाईप चोरी झाले होते. अधिकाऱ्याचे अंगलट येणार असल्याचे कारणावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही. या चोरीला जबाबदार धरत कार्यरत सुरक्षारक्षकांना हटविण्यात आले होते. दुसरे दाेन सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहे. परंतु पूर्ण ९ जागा भरण्यात आले नाही. कार्यरत सुरक्षारक्षक १२ तास सेवा बजावत आहेत. त्यांना साधे ड्रेस कोड, ओळखपत्र देण्यात आले नाहीत. चार सुरक्षारक्षक नियुक्त असताना पूर्ण पदे भरण्यासाठी कुणी राजकीय पुढारी बोलत नाही.
‘सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नऊ सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहे. ते सेवा बजावत आहेत.
-गुलाब पटले, सुपरवायझर सोंड्याटोला सिंचन योजना.