आॅनलाईन लोकमतभंडारा : केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळात अत्याचार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी येणाऱ्या काळात दलित, अल्पसंख्यक, ओबीसी समाजाच्या उपेक्षित घटकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता तथा काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी केले.काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने आयोजित केलेल्या समाजपरिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदर अॅड.आनंदराव वंजारी होते. यावेळी अ.भा. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे महासचिव ख्रिस्टोपर तिलक, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबंधे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल महासचिव जिया पटेल, प्रमोद तितिरमारे, प्रकाश पचारे, विकास राऊत, युवराज वासनिक, संजय मेश्राम उपस्थित होते. तत्पूर्वी शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात ख्रिस्टोपर तिलक म्हणाले, पक्षाला बळकट करण्यासाठी विचारधारा, नेतृत्व, संघटनकार्य या संकल्पना कार्यकर्त्यासमोर मांडल्या. तरूणांना पक्षासोबत जोडण्यावर भर दिला. जिल्हा प्रभारी डॉ.विनोद भोयर यांनी मार्गदर्शन केले. संचालन तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत यांनी तर आभारप्रदर्शन विनीत देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजकुमार मेश्राम, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, नितिन बागडे, अॅड.शशिर वंजारी, लोकचंद बेलकर, अवेश पटेल, शमीम पठान , अयाज पटेल, डॉ.लांडगे, वंदना लोने, सिमा भुरे, गणेश लिमजे, किशोर राऊत, पृथ्वी तांडेकर, डॉ.दिलीप मेश्राम, अमर रगडे, कैलाश बाहे, शमीमा पठान, शिव बोरकर अनवर खान, प्रिया खंडारे, जाबिर मालाधारी, सुभाष गजभिये स्वप्निल भालाधरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकजुटीने संघर्ष करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:36 PM
आॅनलाईन लोकमतभंडारा : केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळात अत्याचार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी येणाऱ्या काळात दलित, अल्पसंख्यक, ओबीसी समाजाच्या उपेक्षित घटकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता तथा काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी केले.काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने आयोजित केलेल्या समाजपरिवर्तन ...
ठळक मुद्देराजू वाघमारे यांचे प्रतिपादन : काँग्रेसचा समाजपरिवर्तन मेळावा