लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आष्टी ते नाकाडोंगरी दरम्यान दुचाकीने पायी जाणाºया इसमाला मागून धडक दिली. उपचारादरम्यान सदर इसमाचा मृत्यू झाला. १५ दिवसानंतरही या प्रकरणाची दखल गोबरवाही पोलिसांनी घेतली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत इसमाचे नाव सोनू उर्फ उत्तम शिशुपाल रंगारी (३४) रा. आष्टी असे आहे.आष्टीवरून नाकाडोंगरीकडे सोनू रंगारी हा आपल्या मित्रासोबत पायी जात होता. पाठीमागून भरधाव दुचाकीने सोनूला जोरदार धडक दिली. यात सोनूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे सोनू रंगारी यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथील मेयो रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान सोनूचा १२ आॅगस्टला मृत्यू झाला.उपचार सुरू असल्याने सोनूच्या आईने गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास उशीर केला. कारवाई अंतर्गत पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली, परंतु दुचाकी चालक सागर नंदरधने याच्यावर कोणतीच कारवाई अद्याप करण्यात आली नाही, असा आरोप मृत सोनुच्या नातेवाईकांनी केला आहे.दुसरीकडे सोनू रंगारीच्या कुटुंबीयांनी रीतसर लेखी तक्रार दाखल केली नाही, असे पोलीस सांगत आहेत. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.मृत सोनू रंगारी यांच्या कुटुंबीयांनी रीतसर लेखी तक्रार दाखल केली नाही. पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर नियमानुसार संबंधितावर नक्कीच कारवाई करण्यात येईल.-किशोर झोटींग, सहायक पोलीस निरीक्षक गोबरवाही.
‘त्या’ प्रकरणात कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:38 AM
आष्टी ते नाकाडोंगरी दरम्यान दुचाकीने पायी जाणाºया इसमाला मागून धडक दिली. उपचारादरम्यान सदर इसमाचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देअपघातात सोनू रंगारीचा मृत्यू : १५ दिवसानंतरही कारवाई थंडबस्त्यात