शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शेतकऱ्यांना पैसे देऊनही सिंचनासाठी पाणी नाही

By admin | Published: August 17, 2016 12:15 AM

सततची नापिकी, वाढलेले कर्ज याला शेतकरी तुर्तास तरी कंटाळला असून यावर्षी तर शेतकऱ्याची स्थिती फारच दयनीय झाली आहे.

यावर्षीही दुष्काळाचा करावा लागणार सामना : भारनियमनामुळे शेतकरी अडचणीतसंजय साठवणे साकोलीसततची नापिकी, वाढलेले कर्ज याला शेतकरी तुर्तास तरी कंटाळला असून यावर्षी तर शेतकऱ्याची स्थिती फारच दयनीय झाली आहे. ज्या शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय नाही असे शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकत असून पैसे देण्यास तयार आहेत. मात्र पैसे देऊनही या शेतकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे आता काय करावे व धानाला कशाने जगवावे व उदरनिर्वाह कसा करावा असा पेच निर्माण झाला आहे.मागील तीन वर्षापासून सततच्या नापीकीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. तोच यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असा अंदाज वेधशाळेने वर्तविल्यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण होते. मात्र जुन, जुलै व आॅगस्ट महिन्यात पावसाची स्थिती पाहिल्यास व तलाव बोड्यांची स्थिती पाहिल्यास शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांनी जमेल तसे पाण्याची सोय करून उशिरा पाशीरा रोवणी केली. मात्र आता धान जगवायला पुन्हा पाण्याची गरज आहे. वरचा पाऊस पडतच नाही. तलावातही पाणी नाही. आता पाणी आणायचे कुठून? त्यामुळे ज्या शेतकऱ्यांजवय पाण्याची सोय नाही ते शेतकरी ज्यांच्याजवळ विहीरी व बोअरवेल आले त्या शेतयकऱ्यांजवळ पाण्याची सोय नाही ते शेतकरी ज्यांच्याजवळ विहिरी व बोअरवेल आले त्या शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन भाऊ पैसे द्या पण पाणी द्या अशी विनवणी करून मात्र ते शेतकरीही हतबल झाले आहेत. कारण त्यांच्याजवळ पाण्याची सोय आहे. मात्र १६ तास भारनियमन असल्यामुळे व ८ तासच विद्युत पुरवठा सुरु असल्यामुळे त्यांच्याच शेतात पाणी पुरत नाही. त्यामुळे हे शेतकरी दुसऱ्यांना पाणी देऊ शकत नाही. ही विदारक परिस्थिती सध्या साकोलीत सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पाणी कुठून आणायचे हा प्रश्नच आहे.१६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वारंवार वीज वितरण कंपनी, आमदार, खासदार यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडीत आहेत. मात्र याचा काही एक उपयोग होत नाही. शेवटी शेतकऱ्यांनी आता उर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावण्यासाठी उद्या दि. १४ ला नागपुरला जाणार आहेत व याचाही तोडगा निघाला नाही तर बेमुदत आंदोलन करणार आहेत. एकीकडे शेतीचा हंगाम, शेतकरी शेतात राबण्याऐवजी भारनियमन बंद व्हावे यासाठी धावताना दिसत आहेत. अशी वेय कदाचित शेतकऱ्यांवर कधीच आली नसेल त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्यासाठी काय करावे व शेती कशी करावी असा प्रश्नच आहे. अधिकाऱ्यांची मंडपाला भेट, तोडगा नाहीआज दिवसभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मडावी, कार्यकारी अभियंता घाटोळे यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला व उर्जामंत्री बावनकुळे यांनी १८ ला नागपूर येथे बोलाविले असून यात भारनियमनासंबंधी काही सांगितले. तोपर्यंत आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. मात्र जोपर्यंत भारनियमन बंद होत नाही तोपर्यंत हे भारनियमन सुरूच राहील, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. यावेळी माजी आमदार सेवक वाघाये, डॉ. अजय तुमसरे, अश्विन नशीने, विजय दुबे, उमेश भुरे, ओम गायकवाड, यशवंत बोरकर व शेतकरी उपस्थित होते.कर्जाचा डोंगर वाढला सततची नापिकीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला असून जुने कर्ज फेडण्याआधी पुन्हा नवीन कर्ज शेतकऱ्यांना ुचलावे लागत आहेत.आता लष्करी अळीचे संकटआधीच पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या शेतकऱ्यावर पुन्हा लष्करी अळीचे संकट आले आहे. तालुक्यात लष्करी अळीच्या प्रकोपामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. औषधीसाठी पुन्हा शेतकऱ्याला पैशाची जुळवाजुळव करावी लागणार आहे.औषधी मोफत द्याशेतकरी आर्थिक संकटात सापडला असूून लष्करी अळीवर प्रतिबंध घालणारी औषधी शासनाने मोफत द्यावी अशी मागणी होत आहे.