लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : वरठी-एकलारी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. वरठी पासून एक किमी अंतरावर असलेल्या एकलारी गावाला जाणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे. दिवस रात्र वाहन व पादचाऱ्यांचा रेलचेल असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. एक किमी अंतराच्या रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे दुर्घटनांना कारणीभूत असून विध्यार्थी व नागरिकां करिता डोकेदुखी ठरत आहेत. वरठी- एकलारी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वरठी - एकलारी रस्ता हा परिसरातील अनेक गावाना जोडणारा रस्ता आहे. वरठी हे गाव केंद्र ठिकाण असल्यामुळे एकलारी, नेरी, बीड, सातोना येथून वरठीला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शालेय शिक्षणा करिता परिसरातील शेकडो विध्यार्थी दररोज वरठीला येतात. या रस्त्याची अवस्था वाईट असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.वरठी- एकलारी - बीड हा रास्ता डांबरी असला तरी डांबरीकरण दूर दूर पर्यंत दिसत नाही. या मार्गावर पडलेले असंख्य खड्डे हे दुर्घटनाना आमंत्रण देणारे आहेत. वरठी - एकलारी रस्त्यांवर पडलेले खड्डे म्हंणजे एकप्रकारचे विश्वरीकार्ड ठरत आहेत. रस्त्यावर पडणारे खड्डे हे नेहमीचे असले तरी वरठी- एकलारी मार्गावर असलेले खड्ड्यात स्वरूप म्हंणजे एकप्रकारचे छोटेखानी डबक्याप्रमाणे आहेत. वरठी येथून एकलारी ला जाण्यासाठी असलेल्या वळण मार्गावर पडलेले खड्डा म्हणजे तलावाचं असल्यासारखा भासतो.वरठी - भंडारा राज्य महामार्ग सोडून राष्ट्रीय महामागार्ला जोडणारा हा रस्ता आहे.नागपूर जिल्ह्यातील गावाना जाण्याकरिता शॉर्टकट मार्ग असल्यामुळे रस्त्यावरून दिवस रात्र रहदारी सुरु राहते. पण रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उखडलेले रस्ता हे जिल्ह्यातील अन्य रस्त्यांची स्थिती दर्शविते. दर दोन फुटावर या प्रमाणे मोजता येणार नाही असे असंख्य खड्डे पडले आहेत. नुसते खड्डे पडले नसून त्यात पावसाचे पाणी जमा झाल्यावर एखादा अपघात झाल्यास खड्यात पडलेले वाहन बुडून जाईल अशी अवस्था आहे. या मार्गावर अनेक वळण मार्ग आहेत. प्रत्येक वळण मार्गावर असलेले खड्डे म्हंणजे अपघाताला आमंत्रण ठरणारे आहेत.वरठी ते एकलारी व एकलारी ते बीड गावाला जोडणारा हा रस्ता खड्ड्यामुळे त्रासदायक ठरला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी जमा राहते. यामुळे या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना खड्डे पडल्याचे दिसत नाही आणि ते नकळत अपघाताला समोर जातात. पाणी भरलेल्या खड्ड्यातून धावणाऱ्या वाहनांमुळे पायी चालणाऱ्या पादचाऱ्याना त्रासदायक ठरत आहे. याचा सर्वात मोठा फटका विध्यार्थ्यांना बसतो. खड्ड्यातील घाण पाणी अंगावर उडाल्याने त्यांना शाळेत जाण्यापासून मुकावे लागते. रस्त्याची वाईट अवस्था जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेचे उदाहरण आहे. सदर रस्ता रास्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
एकलारी रस्ता झाला मृत्यूमार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:58 AM
वरठी-एकलारी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. वरठी पासून एक किमी अंतरावर असलेल्या एकलारी गावाला जाणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे. दिवस रात्र वाहन व पादचाऱ्यांचा रेलचेल असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. एक किमी अंतराच्या रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत.
ठळक मुद्देअपघातात वाढ : वरठीपासून एकलारीपर्यंत खड्डेच खड्डे