लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यात हिरव्या चाºयाचा प्रश्न उद्भवतो. त्यावर मात करण्यासाठी अंतिम वर्षात कृषी शिक्षण घेत असलेल्या साहस झंझाड या विद्यार्थ्याने युरियामिश्रीत पशुखाद्य तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.हरदोली झंझाड येथील साहस दिलीप झंझाड येथील तरुण युवक केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी /गडचिरोली येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागात राहणारा या शेतकऱ्यांच्या मुलाला ग्रामीण भागातील पशुपालन सबंधात जाणीव आहे. खेड्यात पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे बघितले जाते. उन्हाळ्यात हिरव्या चाºयाची प्रचंड कमतरता जाणवत असते. आपल्या शिक्षणाचा लाभ गावातील शेतकऱ्यांना करण्यासाठी त्याची धडपड सुरु होती. उन्हाळ्यात हिरव्या चाºयावर पर्याय शोधण्यासाठी त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत सरदारे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर साहस सध्या कोविड-१९ मुळे गावातच आहे. त्याने युरियामिश्रीत पशुखाद्य कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले. सध्या पावसाळा सुरू असल्याने आपल्या जनावरांना योग्य तो हिरवा चारा मिळतो. त्यांना योग्य पौष्टीक तत्व त्यातून मिळतात. उन्हाळा सारख्या ऋतू मध्ये हिरवा चारा मिळणे कठीण असते. यावेळी अशा प्रकारच्या प्रकिया करून आपण वाळलेल्या चाऱ्याला पोषणयुक्त, प्रथिनेयुक्त पशुखाद्य बनवू शकतो. यामुळे पशूंची दुग्ध देण्याची क्षमता वाढते. योग्य ते प्रथीने मिळतात. त्यांचे दुधाळू जनावरांना हे खाद्य लाभदायक आहे. दूध देण्याचे प्रमाण वाढते. त्यांचे स्वास्थ तंदुरुस्त राहते . मात्र हे खाद्य गर्भधारण पशु देवू नये असे त्यांनी सांगितले.या प्रक्रियेत आपल्याला जास्त चारा घ्यावं लागतो. वास्तविक हे बाजारात विकताना दिसत नाही. जे मोठे फार्म असतात तिथं असे बनवले जातात. साधारणता बाजारात ढेप पशू खाद्य ४० किलो ची बॅग एक हजार रुपयाच्या वर येते. ढेपची किंमत दर्जा पाहून राहाते. ही प्रक्रिया करून कमी खर्चात आपल्याला जेवढं वाटेल तेवढं तयार करू शकतो व पैशाची ची बचत पण होते. प्रात्यक्षिक करतानादिलीप झंझाड, रविंद्र झंझाड, विठ्ठल तित्तीरमारे, सरपंच सदाशिव ढेंगे आदी उपस्थित होते.अशी आहे प्रक्रियाशंभर किलो चाऱ्याची प्रक्रिया कराची असेल तर त्यासाठी २५ लिटर पाण्या मध्ये २ किलो युरिया खत, ३ किलो गुड, एक किलो मीठ गड्याचा यांचा मिश्रण तयार करून त्यांचा २-३ वेळा सुक्या चाऱ्यावर छिडकाव करण्यात यावा. ते तयार केलेले खाद्य हवाबंद ड्रम मध्ये २१ दिवसासाठी ठेवण्यात यावे. नंतरच त्याचा उपयोग करण्यात यावा असे साहसने सांगितले. हे खाद्य पाचवर्षावरील जनावरांना द्यावा. सुक्या चाऱ्यामध्ये सेल्युलोस, लिग्निन च प्रमाण जास्त असते. या प्रक्रिय द्वारे चाऱ्यातले पचणीय पदार्थ ४२ ते ५६ टक्के ने वाढते. प्रथिनाचे प्रमाण ७ ते ८ टक्केनी वाढते. आपल्याला जास्त खर्च येत नाही. बनवलेले ते ताजे खाद्य राहते. यामध्ये फक्त खत, मीठसाठी खर्च लागतो.
युरियामिश्रीत पशुखाद्याने होते दुधात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 5:00 AM
हरदोली झंझाड येथील साहस दिलीप झंझाड येथील तरुण युवक केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी /गडचिरोली येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागात राहणारा या शेतकऱ्यांच्या मुलाला ग्रामीण भागातील पशुपालन सबंधात जाणीव आहे. खेड्यात पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे बघितले जाते. उन्हाळ्यात हिरव्या चाºयाची प्रचंड कमतरता जाणवत असते.
ठळक मुद्देचाऱ्याचा प्रश्न सुटेल : कृषी विद्यालयातील विद्यार्थ्याचा प्रयोग, शेतकऱ्यांना होणार फायदा