लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कास्ट्राईब कल्याण महासंघाची सभा बुधवारी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांच्या दालनात घेण्यात आली.सभेमध्ये संघटनेच्या वतीने मागासवर्गीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी व जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी यांच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना नियमित कामावर ठेवण्यात यावे, बीव्हीजी कंपनीचा कंत्राट ३१ मार्चला संपत असून सदर कंत्राट ज्या दुसऱ्या कंपनीला होणार आहे त्यामध्ये दुसºया कंपनीचा कंत्राट होताना आज कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर ठेवावे, तशी शिफारस सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात येवून न्याय द्यावा, कंत्राटी कर्मचारी घेताना जिल्ह्यातीलच उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, कोणत्याही कंत्राटी कर्मचाºयाला कामावरून कमी करण्यात येवू नये, निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने कोणत्याही कर्मचाºयांची बदली करण्यात येवू नये, शासकीय मुलींचे वसतिगृह भंडारा येथील शिपाई पदावर कार्यरत डहाट या नियत वयोमानानुसार ३० एप्रिलला सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचे सेवानिवृत्ती प्रकरण तात्काळ तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात यावे, नियमित कार्यरत कर्मचाºयांना दर महिन्याला वेतन स्लीप देण्यात यावी, सन २०१३ पासून जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला याची माहिती देण्यात यावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विभागाचे अधीक्षक सुखदेवे, लिपीक सायरे उपस्थित होते. शिष्टमंडळात राज्याचे उपमहासचिव सूर्यभान हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, सचिव हरिश्चंद्र धांडेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोवते, अॅड.बाबूराव दामले, मनोहर मेश्राम, हरिकिशन अंबादे, युवराज रामटेके, अशोक डांगरे, पृथ्वीराज भालाधरे, डहाट, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 9:48 PM
कास्ट्राईब कल्याण महासंघाची सभा बुधवारी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांच्या दालनात घेण्यात आली.
ठळक मुद्देकॉस्ट्राईबची सभा : सहायक आयुक्तांचे आश्वासन