भंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा भंडाराची सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दालनात घेण्यात आली.यावेळी मुख्य कायपालन अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा प्रशासन अधिकारी सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, आडे, मुख्य लेखाधिकारी डॉ.दिपक केदार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, शिक्षणाधिकारी (माध्य.) किसन शेंडे, कार्यकारी अभियंता सेलोकर, निशाने, लघुलेखक शर्मा, नलीनी डोंगरे उपस्थित होते. सभेत जिल्हा आरोग्य विभागाीतल अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे आक्रमक पवित्रा घेत जास्तीत जास्त आरोग्य कर्मचारी अन्याय पिडीत असून या विभागात भ्रष्टाचार असल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर कार्यवाहीसाठी संघटनेचे केंद्रीय उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, जिल्हाध्यक्ष शेखर बोरकर यांनी विषय लावून धरले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन दोन तीन महिन्यात सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नती करण्याचे आश्वासन दिले. ज्या कर्मचाऱ्यांची पाच वर्षापेक्षा एकाच टेबलवर सेवा झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना इतरत्र बदली करण्याचे आश्वासन दिले. शासन निर्णयाच्या आधारे जिल्हा स्थानांतरीत कर्मचाऱ्यांच्या बदल्या सहानुभूतीपूर्वक विचार करून केल्या जातील. संघटनेने नियमबद्ध कारवाई करण्याच्या दृष्टीने सहकार्य केल्यास कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रलंबित आरोग्य विभागाीतल कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता प्रकरणी संघटनेने दिलेल्या उपषोण व आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण तूर्तास करण्यात येईल, असे पत्र दिल्यामुळे संपाची भूमिका मागे घेण्यात आली. यावेळी सूर्यकांत हुमणे, शेखर बोरकर, राजकुमार मेश्राम, विनय सुदामे, जगदीश सुखदेवे, करण रामटेके, प्राचार्य अनमोल देशपांडे, डॉ.मधुकर रंगारी, डॉ.प्रदीप मेघरे, डॉ.महेंद्र गणवीर, आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
कास्ट्राईब महासंघाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
By admin | Published: December 21, 2014 10:54 PM