शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

-अन् त्यांनी केली पाणी टंचाईवर मात

By admin | Published: May 27, 2016 12:55 AM

दुष्काळ, पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती, अशा बातम्या दररोज ऐकायला मिळतात. तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी मराठीत म्हण आहे.

लोकमत जलमित्र अभियान : रेनवॉटर हार्वेस्टिंगतून जलक्रांतीभंडारा : दुष्काळ, पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती, अशा बातम्या दररोज ऐकायला मिळतात. तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा बसल्यावरच आपल्याला जाग येते आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी आपण सरसावतो. पाणी उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचेच काम आहे म्हणून आपण जबाबदारी झटकून मोकळे होतात. परंतु भंडारा शहरातील नारायण कावळे यांनी आपली जबाबदारी ओळखून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे  पुनर्भरण करून त्यांच्या कॉलनीतील पाणी टंचाईच्या परिस्थितीवर मात केली आहे.भंडारा शहरातील खात मार्गावर १५ वर्षांपासून राधाकृष्ण विहार कॉलनी ही नवीन वसाहत वसलेली आहे. भूस्तरीय खडकामुळे या भागातील काही भागात जलस्तर चांगला तर काही भागात तिनशे फूट खोलीवरही पाणी नाही. कावळे हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. त्यांनी या परिसरात घर बांधण्यासाठी नगरपरिषदकडे  घराचा नकाशा मंजुरीसाठी दिला. तेव्हा त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची अट घातली होती. पालिकेने मंजूर केलेल्या प्रत्येक नकाशात अशी अट घातली जाते. घरबांधणी करण्यापूर्वी नकाशातील रेनवॉटर हार्वेस्टिंगनंतर कुठे जाते हा प्रश्न निर्माण होतो. नारायण कावळे यांनी मात्र या अटीचे तंतोतंत पालन केले. त्यांनी पावसाचे इमारतीच्या छतावर पडणारे सर्व पाणी पाईपद्वारे विहिरीत सोडले. छतावरील धूळ , कचरा, थेट विहिरीत जाऊ नये म्हणून त्यांनी टाकीचा फिल्टरसारखा वापर केला. छतावरील पाणी पाईपद्वारे प्रथम या टाकीत जमा होते आणि फिल्टर झालेले पाणी दुसऱ्या पाईपद्वारे विहिरीत सोडले जाते. मागील आठ  वषार्पासून कावळे सतत अशाप्रकारे त्यांच्या घरातील विहिरीचे पुनर्भरण करतात. त्यामुळे त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी असते. यासाठी त्यांनी केवळ दीड हजार रुपये खर्च केले आहे. याच विहिरीतून त्यांनी शेजारच्या पाच-सहा घरांना उन्हाळ्यात पाणी पुरवठा केला. परंतु मागील दोन वर्षांपासून त्यांना शेजारच्यांना पाणी देण्याची गरज भासली नाही, कारण कावळे यांची प्रेरणा घेऊन कॉलनीतील इतर लोकानीही जल पुनर्भरणाचा प्रयोग त्यांच्या घरीसुद्धा राबविला. आश्चर्य म्हणजे आजुबाजूच्या विहीरीना आता मुबलक पाणी आहे. कावळे यांच्या घरी स्वयंपाक घरातील पाणीसुद्धा वाया न घालवता ते पाणी बागेत सोडले जाते.मुख्य म्हणजे अंगणात केवळ चालण्यापुरती फरशी बसवून पावसाचे संपूर्ण पाणी अंगणातच जिरवले जाते. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अंगणात पडणारा धो-धो पाऊस वाहून जातो. मात्र तो तिथेच जिरवला तर भूजलस्तराच्या पातळीत निश्चितच वाढ दिसून येते. . (नगर प्रतिनिधी)