शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

‘त्यांनी’ झाडे लावली आणि जगवलीसुद्धा

By admin | Published: July 06, 2016 12:38 AM

झाडे लावणे ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांना जगविणे कठीण झाले असून वृक्षारोपणानंतर झाडे जगविले नाही असा बहुतांश अनुभव आहे.

निष्टी येथील आदर्श : ६०० झाडांची बहारदार रोपवाटिकाभुयार : झाडे लावणे ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांना जगविणे कठीण झाले असून वृक्षारोपणानंतर झाडे जगविले नाही असा बहुतांश अनुभव आहे. पण त्यांनी कोणताही वाजागाजा न करता झाडे लावली आणि ती जगवली सुद्धा आहेत.पवनी तालुक्यात येत असलेल्या व येथून जवळच असलेल्या निष्टी येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येत असलेल्या कृषी तंत्रनिकेतन शाळेतील शिक्षकांनी ही करामत केली आहे. विविध जातीची अंदाजे ५०० ते ६०० झाडे लावली. ही झाडे लावण्यासाठी त्यांना कोणी आग्रह केला नाही. स्वयंस्फूर्तीने ते पुढे आले आणि वृक्षारोपण केले. अनेक वर्षे ते वृक्षारोपण करूनच ते मोकळे झाले नाही तर लावलेली झाडे जगविण्याचा त्यांनी निर्धार केला. ही वृक्ष लागवड पावसाळ्यात करण्यात आल्याने पावसाळ्यात त्यांना या झाडांना पाणी घालण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. मात्र शाळांना सुट्या लागल्यानंतर उन्हाळ्यात या झाडांना जगवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. यावर शिक्षकांनी विचारविनिमय करून या झाडांना पाणी घालण्यासाठी महिलांना मजुरीने पाण्यावर ठेवले. त्या महिलांनीही झाडाची निगा राखत झाडांना पाणी दिले. आज ही झाडे डौलदार झाली आहेत. शाळेचा परिसर हिरवागार दिसत असून आजही झाडे डोलाने मिरवित आहेत. विद्यालयाचे कृषी सहाय्यक विठ्ठल ठाकरे, कृषी सहाय्यक किशोर पालांदूरकर, प्रा.बाळू फुलबांधे, शालीक पवार, भाकरू जुगनाके व विद्यालयाची संपूर्ण चमू निगा राखत आहेत. वृक्ष जगविल्याने त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. (वार्ताहर)शाळेतील शिक्षकांनी झाडांची उत्तम निगा राखली, म्हणूनच ही झाडे जगली. प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजून आपले कर्तव्य पार पाडले तर नक्कीच नंदनवन फुलेल.प्रा.बाळू फुलबांधे, कृषी सहाय्यक,कृषी तंत्रनिकेतन विद्यालय, निष्टी.