शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

भीमा कोरेगावातून ते सुखरूप परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:16 PM

भीमा कोरेगाव येथील इतिहासाची आठवण सदैव स्मरणात राहावी, यासाठी प्रत्यक्षात भेट देण्यासाठी गेलेल्या अड्याळ आणि चकारा येथील ३० भीमसैनिकांनी १ जानेवारी रोजी झालेला थरार जवळून पाहिला.

ठळक मुद्देअनुभवला थरार : ३० भीमसैनिकांनी सांगितली आपबिती

विशाल रणदिवे।आॅनलाईन लोकमतअड्याळ : भीमा कोरेगाव येथील इतिहासाची आठवण सदैव स्मरणात राहावी, यासाठी प्रत्यक्षात भेट देण्यासाठी गेलेल्या अड्याळ आणि चकारा येथील ३० भीमसैनिकांनी १ जानेवारी रोजी झालेला थरार जवळून पाहिला. तिथे झालेली इत्यंभूत माहिती त्यांनी लोकमतजवळ कथन केली. त्यांची आपबिती ही अंगावर थरकाप सोडणारी आहे.अड्याळ आणि चकारा या दोन्ही गावातून एकुण ३० भीमसैनिक ३१ डिसेंबरच्या पहाटे अड्याळहून भीमा कोरेगावकडे रवाना झाले. १ जानेवारीला सकाळी ९ वाजता भीमा कोरेगाव येथे ते दाखल झाले. दरम्यान ११ ते १२ वाजताच्या सुमारास तेथील स्तंभाचे दर्शन घेतल्यानंतर ते वाहनाजवळ पोहचले. तेव्हा क्षणातच एका इमारतीहून मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. त्या दगडफेकीत नंदलाल मेश्राम, अरुण कऱ्हाडे, दिनेश राऊत, अंतकला वासनिक यांना दगडांचा मार सहन करावा लागला. दगडफेकीमध्ये भाऊराव राघो हुमणे रा.अड्याळ यांना गंभीर इजा झाली. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांनी गर्दीतून धाव घेत आपला बचाव केला. सहकाºयांनी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचेही जखमी व्यक्तींनी आपबिती सांगितली. वाहनाजवळ जाता जाता रस्त्यावर काचांचे तुकडे आणि दोन्ही बाजूला वाहन जळत होते. अड्याळहून जाणारे ३० ग्रामस्थ सुखरुप ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पोहचले. अड्याळहून जाणारे सुखरुप येताच आलेल्यांनी गावात आपबिती सांगितली. भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.