नंदू परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऊसाच्या शेतीत लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर शुक्रवारच्या रात्रीपर्यंत त्या परिसरात ही मादी बिबट फिरकली नाही. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या बिबट्यांच्या पिलांवर नजर ठेऊन असले तरी वाढत्या तापमानामुळे या पिलांना काही धोका झाल्यास वनविभाग अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवसागणिक वनविभागाची चिंता बळावली आहे.कोका अभयारण्याशेजारी असलेल्या नवेगाव येथील ऊसाच्या शेतात एका मादी बिबटने दोन पिलांना जन्म दिला होता, हे वनविभागाला माहित होते. त्यानंतर वनविभाग या प्रकारावर पाळत ठेऊन होता. परंतु बुधवारला त्या शेतात आग लागल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तिथे वनपरिक्षेत्राधिकारी वासीम खान, वनरक्षक डोंगरे व वनमजूर होते. आग या पिलांच्या जवळ पोहोचत होती. त्यामुळे वरिष्ठ वनअधिकाºयांच्या मार्गदर्शनात या सर्वांनी त्या पिलांना सुरक्षित स्थळी हलविले. त्याठिकाणी कॅमेरा लावण्यात आले. परंतु, बुधवारच्या रात्रीपासून शुक्रवारच्या रात्रीपर्यंत ही मादी बिबट त्या परिसरात आली नाही.दरम्यान, गुरूवारला मातेच्या दुधाअभावी ही पिले निस्तेज पडल्याचे लक्षात येताच नागपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरूण खोलकुटे यांच्या मार्गदर्शनात पिलांना ग्लुकोज देण्यात आले. सध्या ही पिले सुदृढ असली तरी त्यांना मातेच्या दुधाची गरज आहे. शेतातील जळण्याचा वास निघून गेल्यानंतर ही मादी बिबट शेतात येईल, असा अंदाज डॉ.खोलकुटे यांनी व्यक्त करून ज्याठिकाणाहून पिलांना आणले त्याच ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरूवारी रात्री पिलांना जुन्याच ठिकाणी ठेवण्यात आले होते. परंतु मादी बिबट आलेली नाही.पिलांची काळजी घेणे ठरले आव्हानपुणे जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे बिबट्याच्या पिलांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याबाबत डॉ.खोलकुटे यांनी जुन्नर येथील डॉ.देशमुख यांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला वनविभागाला दिला. त्यानुसार लहान बाळांना देण्यात येणारे ‘लॅक्टोजीन इनफंट’चे पाच ग्रॅम पावडर हे पाच ग्रॅम पाण्यात मिश्रित करून दर तीन तासांनी पिलांना देण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार हे दूध देण्यात येत आहे. या पिलांची काळजी घेण्यासाठी या पिलांना भाजी ठेवण्याचे कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आहे. दिवसभर गारवा असलेल्या ठिकाणी ठेऊन रात्री ज्याठिकाणी पिले आढळून आली त्याठिकाणी दुसºया कॅरेटमध्ये झाकून ठेवण्यासाठी सांगितले आहे. सध्या हा प्रकार सुरू असला तरी मादी बिबट अद्याप न आल्यामुळे वनविभागाची चिंता बळावत आहे.भंडाºयातील पहिली घटनापुणे व नाशिक जिल्ह्यात ऊसाची शेती केली जाते. तिथे ऊसाच्या शेतात मादी बिबटाने पिलांना जन्म दिल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परंतु भंडारा जिल्ह्यात ऊसाच्या शेतात मादी बिबटने जन्म दिल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या पिलांना हाताळताना नेमकी कोणती खबरदारी घ्यायची याबाबत वनविभागाची दमछाक होत आहे.
तिसऱ्या दिवशीही मादी बिबट फिरकलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:48 PM
ऊसाच्या शेतीत लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर शुक्रवारच्या रात्रीपर्यंत त्या परिसरात ही मादी बिबट फिरकली नाही.
ठळक मुद्देवनविभागाची हालचालींवर नजर : शेत जाळल्याचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता