राजू बांते मोहाडीमुलींना शाळेत येण्यासाठी शासनाची मानव विकास योजना आहे. दगडधोंडे, नदी तसेच वळणावळणाची वाट तुडवत तीन ते पाच किलोमीटर घर ते शाळा रोजची पायपीट करून मुली शाळेत शिकायला येतात. शासकीय यंत्रणेला याची जाणीव असतानाही पुढच्या वर्षी बघू असे सोयीस्कररित्या टाळण्याचा प्रकार सुरु आहे.मानव विकास योजनेसाठी मोहाडी तालुक्याची निवड करण्यात आली आहे. मानव निर्देशांक वाढविण्यासाठी या योजनेअंतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. यात शाळांसाठी शिकवणी वर्ग, अभ्यासिका, मोफत सायकल वाटप, मुलींसाठी मोफत प्रवास आदी योजना राबविल्या जात आहेत. शाळेत येण्यासाठी मुलींना अधिक सोयीचे व्हावे, लांब अंतरावरून येण्याची दगदग थांबावी, शाळेत एकटे पाठविणे धोक्याचे होऊ नये, शिक्षणासाठी मुली प्रवृत्त व्हाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून एस.टी. बसमुळे शाळेत येणे सुलभ झाले आहे. मोहाडी तालुक्यातील या मुलींच्या नशिबी आजही पाच ते सहा किलोमीटरची पायवाट तुडवत शाळेत येणे करावे लागत आहे. मोहाडी येथून सहा किलोमिटर अंतरावर रोहणा गाव आहे. त्या गावाच्या मुलींना मोहगाव देवी, मोहाडीच्या शाळेत पायी यावे लागते. तसेच करडी भागातील मुलींसाठी बस नसल्यामुळे परिसरातील मुलींना शेतातून शाळेत यावे लागत आहे.
‘त्या’ मुलींना घर ते शाळा रोजची पायपीट
By admin | Published: December 29, 2014 12:57 AM