शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

‘त्या’ ग्रामस्थांचा मृत्यूशी दररोजचा सामना!

By admin | Published: June 18, 2016 12:22 AM

साहेब... वाघ रोजच दिसतोजी. वाघाच्या भितीने शेतावर जावे कसे? तो कोणत्या दिशेने वाघ येईल, अनं् कोणत्या दिशेने नाही. याचा नेम नाही.

व्यथा पाऊणगावची : जंगलव्याप्त ग्रामस्थांची खासदारांसमोर आपबितीनंदू परसावार भंडारासाहेब... वाघ रोजच दिसतोजी. वाघाच्या भितीने शेतावर जावे कसे? तो कोणत्या दिशेने वाघ येईल, अनं् कोणत्या दिशेने नाही. याचा नेम नाही. कवा तो आमची नरडी पिचकेल माहित नाही. वावरात गेलो की, घरी वापस जाणार की नाही, याचा नेम नाही. गावात एसटी येत नाही. त्यामुळे जंगलातून पोरांना पाठवावं लागतं. आमच्या पोरांचं शिक्षण बुडतं. शहरातील पोरांसारखं आम्हालाबी आमचे पोरं शिकावयचे हाय. पण वाघाची भीती हाय; अशी आपबिती खासदार नाना पटोले यांच्याजवळ कथन करीत होते, जंगलव्याप्त भागातील परसोडी, पाऊनगांव, खापरी येथील ग्रामस्थ.पवनी तालुक्यातील परसोडी, पाऊनगाव, खापरी या गावाला तीन बाजूंनी पाण्याचा वेढा तर एका बाजूने जंगल आहे. अशा गर्तेत अडकलेल्या गावकऱ्यांना वाघ हा रस्त्यात रोजचं आडवा येतो. याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर होत आहे. मुलांना शिकवून मोठं करावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा. पण बस गावात पोहचत नसल्याने मुलांचा जीव मुठीत घालून त्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठविले जाते. अशा भयान स्थितीत जीव मुठीत घेऊन येथील ग्रामस्थ जगत आहेत. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला लागगून असलेल्या या गावातील आणि हिंस्त्रप्राण्यांमुळे थरकाप उडविणारी ही परिस्थिती गुरूवारला अनुभवली, खासदार नाना पटोले यांनी. दोन दिवसांपूर्वी परसोडी या गावातील रूपचंद माटे हे गावाशेजारी शौचास गेले असता वाघाने त्यांना भक्ष्य बनविले. त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन व वनविभागाकडून मिळणारी मदत देण्यासाठी नाना पटोले हे गावात पोहचले. त्यावेळी मरणाच्या उंबरठ्यावरील ग्रामस्थांनी आपबिती कथन केली. शासनाने जंगल व वन्यप्राणी वाचविण्यासाठी कायदाच बनविला आहे. वन्यप्राण्यांना ठार करणाऱ्यांना शिक्षा होते. वाघाने माणसाला मारल्यास वाघाला सजा होत नाही, त्यामुळे एक तर वाघाला मारा किंवा गावाची मृत्यूच्या दाढेतून सुटका करा, असे आर्जव ग्रामस्थांनी केले. रूपचंद हा वाघाच्या हल्ल्यातील जंगलव्याप्त गावातील तिसरा बळी ठरला. वाघाच्या हल्ल्यात गायी, म्हैसी शेळ्या गमावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाघाला काठीने हाकण्याचा अनुभव रोजचा आहे. वाघाचा बंदोबस्त करा ग्रामस्थांची एकमुखी मागणीजंगलात शेती, शेतीत वाघ मग कसायची कशी? या प्रश्नाने वातावरण गंभीर झाले. नरभक्षी वाघ लवकरच पकडू, या खासदार पटोले यांच्या आश्वासनाने वातावरण निवळायला मदत झाली. उपवनसंरक्षक प्रविणकुमार यांनीही होकारार्थी मान डोलावली उपस्थित ग्रामस्थांना हायसे वाटले. या दुर्गम भागात खासदार पहिल्यांदाच गेले होते. दिवाकरची पत्नी या गर्दीत पोहचली. तिच्या आक्रोशाने वातावरण अधिकच भाऊक झाले. गावाच्या तिन्ही बाजुनी पाण्याचा वेढा तर एका बजून जंगल, पवनीला जाणारा रस्ता येथूनच ३५० लोकसंख्येचे हे गाव चितांग्रस्त असल्याचे, पोलीस पाटील नरेश कुकुटकर खासदारांना सांगत होते. वाघ हा दररोज रस्ता अडवतो, त्यामुळे कित्येकदा बाजार करता येत नाही. व्यवहार ठप्प होतात. मुलांची शाळाही डुबते. म्हणून आम्हाला बस सुरू करून द्या एवढीच मागणी. या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मंत्रालयात पोहचला लवकरच तोडगा काढु, असे आश्वासक उत्तर नाना पटोले यांनी दिले. तिच स्थिती खापरी गावाची होती. यावेळी कौशल्या माहूरे, शंकर माहाजन यांनी वाघाच्या झटापटीत शरीराला झालेल्या जखमा दाखविल्या, ते पाहून मन हेलावले. त्यांनी वर्णीनेला हा प्रसंग ऐकूण अंगाला झिनझिण्या येत होत्या. त्यांना आश्वासक उत्तराशिवाय खासदारांसमोर दुसरा पर्याय नव्हता. सहा वाघामुळे प्रकाशझोतात आलेला उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या पाठीमागचे हे चित्र आहे. या परिसरातील लोकांचे दु:ख कधी सुटणार हाच ज्याचा त्याचा प्रश्न होता. या गावातून जातेवेळी सर्वांची आस नाना पटोले यांच्यावर टिकून होती. ग्रामस्थांचा निरोप घेताना खासदार पटोले यांनाही अश्रु आवरणे कठीण झाले होते.